कोरोना विषाणूच्या (Corona Virus) कहरामुळे चीन (China) सह संपूर्ण जग भीतीच्या छायेखाली वावरत आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. या व्यतिरिक्त 70 हजाराहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अशा परस्थितीत कोरोना विषाणूबद्दल एक खुलासा झाला आहे, जे ऐकून वैज्ञानिकही आश्चर्यचकित झाले आहेत.
एक कादंबरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कादंबरीत असा दावा केला जात आहे की, 40 वर्षांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या पुस्तकात कोरोना विषाणूचा उल्लेख केला होता. आजपासून सुमारे 40 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या लेखकाने आपल्या पुस्तकात कोरोना विषाणू समस्या उद्भवेल अंदाज लावला होता. पहिल्यांदा 'कोरोना' हा शब्द या लेखकाने आपल्या पुस्तकात वापरला होता.
हे पुस्तक एक थ्रिलर कादंबरी आहे असून, त्याचे नाव 'द आईज ऑफ डार्कनेस' (The Eyes of Darkness) असे आहे. डीन कोन्टोझ (Dean Koontz) यांनी 1981 मध्ये हे पुस्तक लिहिले होते. त्यांनी पुस्तकात 'वुहान-400' नावाच्या विषाणूचा उल्लेख केला. पुस्तकात हा विषाणू प्रयोगशाळेत एक शस्त्र म्हणून बनवल्याचे म्हटले आहे. म्हणजेच कोरोना विषाणू हा कुठल्या प्राण्यापासून आला नाही, तर त्याला मुद्दाम प्रयोगशाळेत तयार केले गेले आहे. या पुस्तकात एका आईची कहाणी आहे जी एका गुप्त मिशनवर गेलेल्या मुलाच्या शोधात आहे.
Is Coranavirus a biological Weapon developed by the Chinese called Wuhan -400? This book was published in 1981. Do read the excerpt. pic.twitter.com/Qdep1rczBe
— Manish Tewari (@ManishTewari) February 16, 2020
पुस्तकात उल्लेख केलेला विषाणू एक गुप्त शस्त्र म्हणून वुहानमध्ये बनविला गेला होता. चीनने शत्रू देशांचा नाश करण्यासाठी हे जैविक शस्त्र बनवले, परंतु आता चीनच्याच शहरातील लोक त्याला बळी पडत आहेत. या पुस्तकाच्या कथेसारखे काहीतरी सध्या चीनमध्ये घडत आहे. वुहानमधून हा विषाणू पसरला आहे आणि आता तो संपूर्ण जग व्यापून टाकत आहे.सध्या हे पुस्तक सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Coronavirus in Italy: इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे एकाचा मृत्य; इतर अनेक देशांत पोहोचले विषाणू)
माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरून या पुस्तकाचे ते पान शेअर केले आहे. या पुस्तकातील ही बाब समोर आल्यावर आता वैज्ञानिकही आश्चर्यचकित झाले आहेत. या पुस्तकातील संदर्भ डेट लोक आता या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी सध्याच्या कोरोना विषाणूच्या साथीशी जोडत आहेत.