Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोचे (Delhi Metro) व्हिडिओ दररोज इंटरनेटवर व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये काहीजण रील बनवताना दिसतात तर काही भांडताना दिसतात. अलीकडेच पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुणी आणि तरुण एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. काही वेळातच परिस्थिती इतकी वाढते की, मुलगी रागाने त्या मुलाला चापट मारते. सीट आणि शॉर्ट कपड्यांवरून कॉमेंट केल्याने हा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दिल्ली मेट्रोमध्ये एक मुलगा त्याच्या सीटवर बसला आहे. एक मुलगी त्या मुलावर जोरात ओरडत आहे. काही वेळातच मुलगा आणि मुलगी यांच्यातील वाद इतका वाढतो की, तरुणी मेट्रोतील मुलाच्या कानशिलात लगावते. ज्याच्या प्रत्युत्तरात तो मुलगाही चिडतो आणि मुलीला कोपर मारण्यासाठी उभा राहतो. (हेही वाचा -Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो मध्ये एका महिलेचा दोन पुरूषामध्ये जबरदस्तीने बसण्याचा प्रयत्न; नियम पाळत असल्याचा करत राहिली दावा (Watch Video))
भांडणाच्या वेळी, मेट्रोच्या जवळपासचे लोक त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण दोघांपैकी कोणीही माघार घेताना दिसत नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुणीची समजून घालवण्यासाठी एक महिला तिला मेट्रोच्या गेटवर उभी राहते. तर दुसरीकडे, तरुणाला समजावून त्याला त्याच्या जागेवर बसवले जाते. पण तरीही दोघेही सतत एकमेकांशी शाब्दिक भांडण करतात. (हेही वाचा- Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये रील काढण्यासाठी मुलीने केला अश्लील डान्स; यूजर्स म्हणाले की, 'थोडी तरी लाज वाटू द्या', पहा व्हिडिओ)
पहा व्हिडिओ -
@gharkekalesh pic.twitter.com/G1eeGuRsJs
— Arhant Shelby (@Arhantt_pvt) July 27, 2024
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @Arhantt_pvt नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ही थप्पड जर मुलाने मुलीला दिली असती तर आतापर्यंत गदारोळ झाला असता. दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, दिल्ली मेट्रोमध्ये ही रोजची गोष्ट आहे.