Viral Video: दिल्ली मेट्रो (Delhi Metro) मध्ये अश्लीलता थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोशल मीडियावर (Social Media) दररोज असे काही अश्लील व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. नुकताच पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी रील बनवण्यासाठी अश्लील डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीचे हे कृत्य पाहून लोक संतप्त झाले असून तरुणीवर टीका करण्यात येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातलेली एक मुलगी मेट्रो ट्रेनच्या आत धावत आहे आणि नाचत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, तरुणीने हा व्हिडिओ रील बनवण्यासाठी स्वत: शूट केला आहे. ती भोजपुरी गाण्यावर अश्लील डान्स करत आहे. मेट्रोमध्ये मुलीच्या जवळ एक महिलाही उभी आहे जी तिला पाहून आश्चर्यचकित झाली. तरुणीचा हा अश्लील डान्स पाहून महिलेला अस्वस्थ वाटत आहे. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)