Chandigarh: तिन महिलांध्ये रस्त्यावर वाद, एकमेकांना जोरदार मारहाण; Video व्हायरल
Chandigarh | PC twitter

Woman Trending Video: चंडीगढ (Chandigarh) शहरातील तीन महिलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, तिघीही एकमेकींशी जोरदार भांडण करत आहेत. सुरुवातीला एकमेकींशी सुरु असलेली त्यांची बाचाबाची पुढच्या काहीच क्षणात हातापायीत बदलते आणि तिघीही एकमेकींना भररस्त्यात ठेसे लगावतात. सोशल मीडियातून व्हायरल झालेली ही व्हिडिओती घटना रविवार (20 ऑगस्ट) रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. रोड रेज आणि रॉन्ग साईड गाडी चावलवण्यावरुन तिन्ही महिलांमध्ये ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्यामध्ये तिघींनीही एकमेकांना एथेच्छ प्रतिसाद दिला.

प्राप्त माहितीनुसार ही घटना चंडीगढ शहरातील सेक्टर 34 मध्ये घडली. एक तरुणी रस्त्यावर चुकीच्या बाजूने आपले चारचाकी वाहन हाकत होती. या वेळी उपस्थित नागरिकांनी तिला हटकले. तरीही तरुणीने कोणाचेही काहीही ऐकले नाही. तील उलट लोकांनाच बडबडू लागली. त्यात तिचे लक्ष विचलीत झाले आणि तिने एका समोरच्या टॅक्सीला धडक दिली. ज्यात दोन महिलां बसल्या होत्या. त्या महिलांनी तरुणीला जाब विचारताच तिचा पारा चढला. ज्यामुळे तिने थेट शिविगाळ करत मारहाणच सुरु केली. घटनेचा व्हिडिओही पुढे आला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, एक तरुणी दोन महिलांवर लाथा-बुक्क्यांनी माराहण करते आहे. तरुणीचा तोरा पाहून संतापलेल्या महिलाही मग तिचे केस ओढीन तिला प्रतिकार करताना दिसतात. (हेही वाचा, Viral Video: हाय-स्पीड बाईकवर उभं राहून तरुणीने पाटण्याच्या मरीन ड्राईव्हजवळ हातात पिस्तूल घेऊन बनवलं रील, पहा व्हायरल व्हिडिओ)

व्हिडिओ

दरम्यान, कार चालकाने तातडीने पोलिसांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. तसेच, तरुणी चुकीच्या बाजूने आपले वाहन हाकत असल्याचेही सांगीतले. थोड्या वेळाने सेक्टर 34 चे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी प्रकरणाची दखल घेऊन सदर तरुणी, दोन महिला आणि त्यांचा चालक अशा सर्वांची वरात पोलीस स्टेशनला नेली. तेथे त्यांच्यात काही संवाद झाला. तिन्ही महिलांनी एकमेकींशी संवाद करत प्रकरण मिटवल्याचे समजते.