Fact Check: BSNL Bharat Fiber Dealership मिळवण्यासाठी bsnlbharatfiberdealer.in वेबसाईटद्वारे पैशांची मागणी? PIB ने सांगितले सत्य
Fake Website (Photo Credits: Twitter/PIBFactCheck)

एका वेबसाईटद्वारे बीएसएनएल भारत फायबर डिलरशीप (BSNL Bharat Fiber Dealership) देण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे. bsnlbharatfiberdealer.in असे या वेबसाईटचे नाव आहे. दरम्यान, हा मेसेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) यामागील तथ्य तपासले असून सत्याचा खुलासा केला आहे. भारत फायबर (Bharat Fiber) ही भारत संचार निगम लिमिडेट (Bharat Sanchar Nigam Ltd.) ची ब्रॉडब्रँड सर्व्हिस (Broadband Service) आहे.

पीआयबी ने ट्विटद्वारे ही वेबसाईट फेक असल्याचे स्पष्ट केले आहे. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "ही वेबसाईट फेक असून नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणूक करणाऱ्या वेबसाईटवर विश्वास ठेवू नये." (फेक वेबसाईट कडून 2 लाखापर्यंत ‘Pradhan Mantri Yojana Loan’अंतर्गत कर्ज मिळत असल्याचा दावा; जाणून घ्या या वायरल न्यूज मागील सत्य)

Fact Check By PIB:

यापूर्वी अशा प्रकारच्या अनेक फेक वेबसाईट बाबत नागरिकांना जागरुक करण्यात आले आहे. खोट्या वेबसाईटद्वारे नागरिकांची फसवणूक होत असल्याने या सापळ्यात न अडकण्याचे आवाहन पीआयबी फॅक्ट चेकद्वारे वारंवार करण्यात येते. दरम्यान, कोणत्याही प्रकारची सत्य माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे.