Nubia Cristina Braga | (Photo Credits: Instagram)

ब्राझिलियन इंस्टाग्राम एन्फ्युएन्सर अशी ओळख असलेल्या नुबिया क्रिस्टिना ब्रागा ( Brazilian Instagram influencer Nubia Cristina Braga ) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 23 वर्षीय नुबिया क्रिस्टिना ब्रागा (Nubia Cristina Braga) हिचा मृतदेह ब्राझीलमधील (Brazil ) सर्जिप स्टेटमधील (Sergipe State) अराकाजू (Aracaju) येथील सांता मारियाच्या घरात आढळून आला. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.

दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी तिच्या राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या केली आणि घटनास्थळावरुन पळ काढला. सुमारे 60,000 इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेली 23 वर्षीय कंटेंट क्रिएटर नुबिया क्रिस्टिना ब्रागा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (हेही वाचा, इंस्टाग्राम पोल वर फॉलोअर्सनी दिलेला सल्ला ऐकून 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या)

इन्स्टाग्राम पोस्ट

सांगितले जात आहेकी, हत्येपूर्वी ब्रागा ही एअर सलुनमध्ये जाऊन आली होती. ती घरी परतल्यावर अगदी काहीच वेळात दोन अज्ञात पुरुष दुचाकीस्वार तिच्या घरासमोर आले. तिच्या घराच्या उघड्या फाटकातून त्यांनी आत प्रवेश केला. सोशल मीडिया स्टार नुबिया क्रिस्टिना ब्रागा हिला समोर पाहताच त्यांनी गोळीबार केला. त्यांनी तिच्यावर बंदुकीच्या गोळ्यांचे अनेक राऊंड फायर केले. काही वेळाने स्थानिक पोलिसांनी घटनेची माहिती मिळाली. पोलीस अधिकारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले तेव्हा नुबिया क्रिस्टिना ब्रागा मृतावस्थेत आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसतील, असे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहे.

इन्स्टाग्राम फोटो

प्राथमिक माहितीनुसार, नुबिया क्रिस्टिना ब्रागा हिच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. परंतू, पोलिसांनी तपास वेगाने सुरु केला आहे. तसेच, हल्लेखोरांबद्दल जर कोणाला माहिती असेल तर नागरिकांनी स्वत:हून पुढे येत माहिती द्यावी, असे अवाहनही पोलिसांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पोस्ट

ब्राझिलियन न्यूज पोर्टल जी 1च्या वृत्तानुसार, नुबिया क्रिस्टिना ब्रागाचे अराकाजू येथील सांता मारिया परिसरातील नातेवाईक गुन्हा कशामुळे झाला याची उत्तरे अजूनही शोधत आहेत. नुबियाची चुलती म्हणाली की, हल्लेखोरांनी नुबियाशी असे का केले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तिच्या मृत्युळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला असून, तीच्यावर रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत.