तुम्ही सध्या भारतामध्ये युट्युब चॅनल्स अॅक्टिव्हली फॉलो करत असाल तर तुम्हांला हमखास 'Binod'असं लिहलेल्या अनेक कमेंट्स पहायला मिळाल्या असतील. सध्या हा 'Binod'सोशल मीडियामध्ये स्पॅमिंग ट्रेंड बनला आहे. ट्वीटरवर देखील 'Binod Memes' चा धुमाकूळ आहे. यावरून अनेक जोक्स, मजेशीर ट्वीट पहायला मिळत आहेत. त्यामुळे काही जण हा नेमका 'Binod'आहे कोण? याचा शोध घेत आहे तर काही केवळ या ट्रेंडिंग हॅशटॅगला जोडून आपली स्वतःची काही मिम्स, जोक्स जोडून युट्युबर्स आणि नेटकर्यांना स्पॅम करत आहेत. पण नेमका हा ट्रेंड सुरू कसा झाला? सध्या सोशल मीडीयावर तो का धुमाकूळ घालतोय? हा प्रश्न तुम्हांलाही सतावतोय मग जाणून घ्या व्हायरल ट्रेंड मागची कहाणी.
'Binod'ची कहाणी सुरू झाली युट्युब चॅनल स्ले पॉईंट (Slayypoint)वरून . या चॅनलवर Why Indian Comments Section is Garbage या व्हिडिओमध्ये इंडियन युजर्स कमेंट्स कसे करतात अशा विषयाचा मजेशीर व्हिडिओ आहे. यामध्ये एकाने कमेंट सेक्शन मध्ये केवळ स्वतःचं नाव 'Binod'इतकंच पोस्ट केलेल होते. याला सात लाईक मिळाले आणि पुढे हा व्हयरल ट्रेंड झाला. बघता बघता युट्युबर्सच्या लाईव्ह स्ट्रिमिंग मध्ये 'Binod'या इतक्याच नावाचं स्पॅमिंग सुरू झालं आहे. आता यावरून मिम्स, जोक्स व्हायरल होण्यास सुरूवात झाली आहे.
पहा 'Binod'चे मजेशीर मिम्स आणि विनोद
My timeline right now ~ 😐#binod pic.twitter.com/2T8sdpkQ45
— Ritika Sharma🥀 (@nihayati_lazy) August 6, 2020
Everyone making meme's on Binod
Binod be like:- pic.twitter.com/6csWbboLrm
— H I M A N S H U 💥 (@broken_kundan_) August 6, 2020
*Binod in every youtuber's comment section #binod pic.twitter.com/9EPLNdE2mb
— अर्पिता🦋 (@_Oyeelaughter_) August 7, 2020
Every Memer Right now-#binod pic.twitter.com/CBLZW6RDGH
— HiⓂ️anshi J🅰️in (@lawyerdhimanshi) August 6, 2020
आजकाल सोशल मीडीयामध्ये कधी, काय ट्रेंड होईल याचा नेम नाही. पण सध्या 'Binod'चांगलाच प्रसिद्ध होत आहे. मग तुम्हीदेखील त्याचा आनंद घ्या. ट्वीटरवर देखील आता 'Binod'टॉप ट्रेंड्समध्ये पहायला मिळत आहे.