Flipkart वरुन iPhone 11 Pro खरेदी करणे पडले महागात, ग्राहकाला डिलिव्हरी ऑर्डरमध्ये मिळाला नकली आयफोन
iPhone 11 Pro (Photo Credits-Twitter)

जगप्रसिद्ध कंपनी आयफोन यांनी त्यांच्या 11 सिरिज मधील iPhone11 Pro गेल्याच दोन महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आला आहे. त्यानंतर आयफोन 11 प्रो साठी देण्यात आलेल्या कॅमेऱ्यावरुन त्याच्या मॉडेलची नेटकऱ्यांकडून जरी खिल्ली उडवली गेली तरीही ग्राहकांनी तो खरेदी केला आहे. या आयफोनची ऑनलाईन पद्धतीने सुद्धा विक्री केली जात आहे. तर ई-कॉमर्स मधील फ्लिपकार्ट येथून एका ग्राहकाने आयफोन 11 प्रो खरेदी केला. मात्र या ग्राहकाला त्या फोनची डिलिव्हरी मिळाल्यानंतर ऑर्डरमध्ये नकली आयफोन देण्यात आला आहे.

इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, बंगळुरु येथील राजनी कांत कुशवाह या व्यक्तीने फ्लिपकार्टवरुन 64 जीबी असलेला आयफोन 11 प्रो ऑर्डर केला होता. या स्मार्टफोनसाठी त्याने 93,900 रुपये खर्च केले. मात्र आयफोनची डिलिव्हरी आल्यानंतर फोन पाहताचा तो हैराण झाला. कारण ऑर्डरमध्ये देण्यात आलेला आयफोन नकली असून त्याच्या मागील बाजूल ट्रिपल कॅमरा असलेला स्टिकर लावण्यात आला होता.(WhatsApp: फिंगरप्रिंट, फेस अनलॉक फिचर्स अॅक्टीव्ह करण्याची एकदम सोपी पद्धत)

 या पीडित ग्राहकाने असे म्हटले होते की, आयफोनचा बॉक्स उघडून पाहिला असता तो हुबेहुब आयफोन 11 प्रो सारखा दिसत होता. मात्र नीट पाहिले असता त्यामध्ये कॅमेऱ्याच्या येथे फेक कॅमेरा सेटअपचा स्टिकर लावण्यात आला होता. त्याचसोबत या फोनमधील सॉफ्टवेअर हे iOS नव्हते. कारण यामधील फिचर्स हे अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनसारखे देण्यात आले होते.

जर तुमच्याकडे iPhone X किंवा कोणताही लेटेस्ट स्मार्टफोन आहे तर, त्यात तुम्हाला Face ID ऑप्शन दिसेल. हे फिचर iPhoneX, iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR मध्ये उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे असलेला iPhone जुना असेल तर त्यात Touch ID नावाचा ऑप्शन मिळेल. हे फिचर iOS 8 आणि त्यावरच्या व्हर्जनसाठी काम करेन.