WhatsApp: फिंगरप्रिंट, फेस अनलॉक फिचर्स अॅक्टीव्ह करण्याची एकदम सोपी पद्धत
WhatsApp Fingerprint and Face Unlock features | (Photo credit: archived, edited, symbolic images)

‘Touch ID/Face Unlock’ हे फिचर WhatsApp ने लाँच करुन आता तब्बल एक महिना उलटला. या फिचर्सचे युजर्सकडून जोरदार स्वागतही झाले. ऑथेंटिकेशन फीचर(unlock) असे या फिचरचे नाव आहे. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचे WhatsApp चॅट अधिक सुरक्षित बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप सेटींग्जमध्ये जाऊन Require TouchID निवडायचा आहे. मात्र, ही पद्धत कमालिची सोपी असूनही, अनेक युजर्सना हे फिचर व्हॉट्सअॅपमध्ये कसे अॅक्टीव्ह करायचे याबाबत पूर्ण माहिती नाही. म्हणूनच अशा युजर्ससाठी हे फिचर्स वापरण्यासंबंधी उपयुक्त माहिती.

जर तुमच्याकडे iPhone X किंवा कोणताही लेटेस्ट स्मार्टफोन आहे तर, त्यात तुम्हाला Face ID ऑप्शन दिसेल. हे फिचर iPhoneX, iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR मध्ये उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे असलेला iPhone जुना असेल तर त्यात Touch ID नावाचा ऑप्शन मिळेल. हे फिचर iOS 8 आणि त्यावरच्या व्हर्जनसाठी काम करेन.

कसे करा अॅक्टीव्ह?

आपल्या स्मार्टफोनमदील WhatsApp ओपन करा. आता सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जा. आता तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील. यात अकाऊंटवर क्लिक करा. अकाऊंटवर क्लिक करताच प्रायव्हसी सिलेक्ट करा. त्यानंतर ‘Security’ ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ‘ScreenLock’ ऑप्शनलला सिलेक्ट करा. जेव्हा आपण आपल्या फोनमध्ये Face ID किंवा Touch ID अनेबल कराल आणि पुन्हा व्हॉट्सअॅप उघडाल तेव्हा आपल्याला फिंगरप्रिंट किंवा फेस ऑथेंटिकेशन द्यावे लागेल. जर आपला फोन फेस किंवा फिंगरप्रिंटद्वारे व्हॉट्सअॅप उघडण्यास नकार दर्शवत असेल तर, तुम्हाला 6 अंकी iPhone Passcode टाईप करावा लागेल. (हेही वाचा, हेडफोन लावल्यावर डिस्टर्ब करणाऱ्या WhatsApp नोटीफिकेशनचा दाबा गळा; हा पर्याय सोपा)

या फिचर्सचा फायदा असा की, WhatsApp आपला चेहरा पाहून किंवा फिंगरप्रिंटच्या माध्यमातून उघडता येईल. त्यामुळे तुमच्या नकळत तुनचा पासवर्ड चोरुन माहिती लिक होण्याचा धोका कमी होईल .फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक फिचर वापरण्यासाठी iPhone यूजर्सला अॅप स्टोअर्समध्ये जाऊन iOS 2.19.21 व्हर्जन अपडेट करावे लागेल.