बंगळुरु येथे आकाशात दिसले Sun Halo, फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित
Sun Halo (Photo Credits-Twitter0

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वांनाच फटका बसला आहे. तर दररोज टेलिव्हिजनवर कोरोना संबंधित विविध घटना समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात काहीशा प्रमाणात भीती सुद्धा निर्माण झाली आहे. मात्र या आव्हानात्मक परिस्थितीत जर एखादी आश्चर्यचकित करणारी गोष्टी बंगळुरुतील (Bengaluru) आकाशात दिसून आली आहे. बंगळुरु मध्ये सोमवारी सकाळी सूर्याच्या भोवती एक गोलाकार खळ तयार झाले होते. या प्रकारचे खळ दिसणे दुर्मिळ आहे. पण या खळ्याला प्रभामंडळ असे म्हटले जाते. याचे फोटो सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहेत.

खरंतर सकाळच्या वेळी सुर्याच्या भोवती एक सप्तरंगी प्रभामंडळ तयार झाल्याचे दिसून आले. हे प्रभामंडळ अगदी गोलाकार असल्याने लोकांच्या नजरा त्याच्याकळे वळल्या गेल्या आणि त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात हे अनोखे दृष्य कैद केले आहे. तसेच फोटो सोशल मीडियात सुद्धा त्यांनी पोस्ट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.(Himalayas Viral Photos: उत्तर प्रदेशच्या सहारनपूर मधून सलग दुसर्‍या वर्षी हिमालयाचं दर्शन; इथे पहा वायरल फोटोज)

Tweet:

Tweet:

Tweet:

सोशल मीडियात युजर्सकडून याचे फोटो टिपण्यासह त्यांनी आकाशातील दृष्ट पाहून आनंद सुद्धा व्यक्त केला आहे. तर एका युजर्सने असे म्हटले की, बंगळुरुचे आकाश अजूनही चमकत आहे.