Himalayas Viral Photos: उत्तर प्रदेशच्या सहारनपूर मधून सलग दुसर्‍या वर्षी हिमालयाचं दर्शन; इथे पहा वायरल फोटोज
हिमालयाचे वायरल फोटोज । Photo Credits: Twitter/ ANI

भारतामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या प्रादुर्भावामुळे आता पुन्हा भारतातील अनेक शहरं लॉकडाऊन मध्ये आहेत. लॉकडाऊन अनेकांच्या पोटावर गदा आणत असला तरीही याचा एक चांगला परिणाम निसर्गात दिसत आहे तो म्हणजे प्रदुषणात घट. सध्या अत्यावश्यक सेवा वगळता सामान्यांची रहदारी मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याने आता सहारनपूर (Saharanpur) मधून पुन्हा हिमालय (Himalaya) स्पष्ट दिसू लागला आहे. सध्या सहारनपूरामधून क्लिक केलेलं हिमालय दर्शनाचे फोटोज (Himalayas Viral Photos) चांगलेच वायरल होत आहेत. ढग आणि धुक्यात हरवलेली हिमालयाची शिखरं नेटकर्‍यांना सुखावणारी आहेत.

सध्या सोशल मीडीयात वायरल होणारे हिमालयाचे फोटोज सहारनपूर जिल्ह्यातील आयकर अधिकरी दुष्यंत सिंह यांनी टिपलेले आहेत. दुष्यंत यांनी आपल्या वसंत विहार कॉलनीतून हिमालयाचे फोटो क्लिक केले. हिमालयातील गंगोत्री, यमुनोत्री आणि शिवलिक पर्वतरांगा प्रदूषणात घट झाल्याने आता हिमालयाचं दर्शन इतक्या लांबून पुन्हा होत आहे. आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटोज 20 मे दिवशी क्लिक केलेले आहेत. इथे पहा मागील वर्षीचे हिमालय दर्शानचे फोटोज.

सहारनपूर मधून दिसणारा हिमालय

Dr Vivek Banerjee यांनी टिपलेले दृश्य

मागील वर्षी देशील उत्तर प्रदेशाच्या सहारनपूर मधून असेच हिमालयाचं दर्शन झाले होते. 30-40 वर्षांपूर्वी अशाप्रकारे इतक्या हजारो किलोमीटर दुरून भारतामधून लोकांना हिमालय दिसत होता. पण आता कोविड मुळे हा प्रत्यय पुन्हा येत आहे. सहारनपूर पासून हिमालय अंदाजे 150 किमी दूर आहे. मागील काही दिवस उत्तरेमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे पाऊस बरसला आहे आणि त्या नयनरम्य वातावरणामध्ये अनेकांना हिमालयाच्या दर्शनाची पर्वणी मिळाली आहे.