वाढदिवस आणि तो साजरा करणे अनेकांना आनंद देणारी बाब. त्यामुळे अपवाद वगळता जवळपास सर्वच जण वाढदिवस साजरा करतात. त्यातही वाढदिवस जर शंभरावा असेल तर? तो दिवस ती व्यक्ती आणि त्या व्यक्तिचे आप्तेष्ठ यांच्यासाठी प्रचंड महत्त्वाचा नक्कीच असणार. पण, अशा वेळी जर पोलीस आले आणि वाढदिवस असलेल्या व्यक्तीला त्यांनी अटक (Australia Police Arrest Woman On Her 100th Birthday) केली तर? होय, असे घडले आहे. ऑस्ट्रेलियातील (Australia) एका महिलेने वयाची 100 वर्षे पूर्ण केली. वयाची शंभीर पार केल्याबद्दल ही महिला वाढदिवस साजरा करत होती. असे असताना पोलीस (Australia Police) त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तिला एक विचित्रच कारण सांगत अटक केले. घ्या जाणून काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियातील विक्टोरीयामध्ये राहणारी जीन बिकेनटन (Jean Bickenton) ही महिला आपला वाढदिवस साजरा करत होती. जीन बिकेनटन या ही पूर्वी परिचारिका म्हणजेच नर्स म्हणून काम करत होती. काही कधीतरी पाठिमागे तिने स्वत:ला अटक व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. कधी काळी या महिलेने व्यक्त केलेली इच्छा पोलिसांना या महिलेच्या 100 व्या वाढदिवसा निमित्ताने आठवली आणि ते कामाला लागले. त्यांनी या महिलेला थेट अटक केली. (हेही वाचा, PM Sanna Marin Viral Video: फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन पार्टीत नाचल्या, खासगी व्हिडिओ व्हायरल होताच भलत्याच नाराज झाल्या)
ट्विट
ऑस्ट्रेलिया पोलिसांनी व्हिक्टोरिया पोलिसांनी अटक केल्यानंतर या कारवाईची छायाचित्रे फेसबुकवरही (Facebook) शेअर केली आहेत. अटक केल्यानंतर पोलिसांनी या महिलेची सुटकाही केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन युवा कॉन्स्टेबल विक्टोरियाच्या गार्डन रेजिडेन्शियल मध्ये महिलेच्या घरी पोहोचले. तिला हातकडी घातली. या महिलेला प्रतिकात्मकरित्या अटक केली. नंतर दिला सोडून दिले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी या महिलेचा वाढदिवसही साजरा केला. ही अटक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.