आरपीएफच्या जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरत असणाऱ्या प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकात (Kalyan Railway Station) आज (28 ऑगस्ट) घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चुकीच्या ट्रेनमध्ये चढल्याचे समजात एका प्रवाशाने आपल्या मुलासह धावत्या ट्रेनमधून उडी मारली. ते ट्रेन खाली जाणार तितक्यात ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफच्या एका जवानाने प्रवाशाला बाजूला ओढले. ज्यामुळे त्यांना जीवनदान मिळाले आहे, असेही म्हणता येईल. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या व्हिडिओतील जवानावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सफेद शर्ट घातलेला व्यक्ती आपल्या मुलासह धावत्या ट्रेनमधून उडी मारताना दिसत आहे. मात्र, त्यावेळी ट्रेनचा वेग वाढल्यामुळे दोघेही व्यक्ती फलाटावर पडले. परंतु, त्याचवेळी आरपीएफच्या जवानाने त्यांना बाजूला काढले. ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. हे देखील वाचा- Watch Video: धावत्या रेल्वेसमोरुन मुलांनी घेतल्या पूर आलेल्या नदीत उड्या; मग पुढे काय झाले? तुम्हीच पाहा

ट्वीट-

सध्या देशासह संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. ज्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यां वगळता कोणालाही रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा नाही. ज्यामुळे रेल्वे अपघाताच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे.