Snake Viral Video: म्हातारीने खतरनाक सापाबरोबर असे काही केले जे करण्याचा कोणी तरुण ही विचार करणार नाही, पाहा म्हातारीने काय केली कमाल 
Photo credit : Twitter

ते म्हणतात ना की एखादी आई कोणाशीही लढू शकते, जरी गडगडाटी वादळ जरी आले तर ती त्याच्याशीही झगडायला कधीही घाबरत नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक आई हातात एक लांब विषारी साप पकडताना दिसली आहे. हा व्हिडिओ एका गावातून आल्याचा अंदाज आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहु शकता की,एक म्हातारी महिला आपल्या हातात एक विषारी साप धरून गावाबाहेर फिरताना दिसत आहे.तसे तर सापाचे नाव ऐकल्यानंतर अनेकांची हवा टाइट होते. आपण पाहू शकता की ती स्त्री निर्भयपणे वेगवान हालचाली करताना दिसली आहे आणि नंतर ती त्या सापला गावाबाहेर फेकते. त्या बाईकडे पहिलं तर असं वाटतं की ती ट्रेंड साप पकडणारी आहे. (Viral Video: तुम्ही कधी क्रिकेट खेळणारा हत्ती बघितला का? व्हिडिओ पाहून सर्वांच्या भुवया उंचावतील )

व्हिडिओमध्ये दिसणारा साप म्हणजे किंग कोब्रा. किंग कोबरा ही एक अतिशय विषारी आणि प्राणघातक प्रजाती आहे. त्याच्या विषाच्या काही तपशीलांमुळे बरेच लोक मारले जाऊ शकतात.हा व्हिडिओ ट्विटर Fred Schultz ने शेअर केला आहे.आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'Moms take care of everything'

या व्हिडिओला आतापर्यंत 23 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि 500 हून अधिक पसंती ही मिळवल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत आणि त्या महिलेच्या धैर्याचे कौतुक ही करत आहेत.