Elephant Playing Cricket (Photo Credit: Twitter)

सोशल मीडिया (Social Media) हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. सोशल मीडियाचा वापर करणारे लोक क्विचितच असतील. महत्वाचे म्हणजे, सोशल मीडियावर दररोज अनेक आगळेवेगळे आणि मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातच आणखी एक मजेदार व्हिडिओ आपल्या समोर आला आहे, ज्यात एक हत्ती चक्क क्रिकेट खेळताना (Elephant Playing Cricket) दिसत आहे. एवढेच नव्हेतर, फलंदाजी करत असताना चांगले फटके लगावत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर होणाऱ्या या व्हिडिओला मोठी पसंती दाखवली जात आहे.

'द क्रिकेट' या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक हत्ती क्रिकेट खेळताना दिसत आहे. तो फलंदाजी करत असताना त्याच्या आजूबाजुला काही लोक फिल्डिंग करत आहेत. तर, एक व्यक्ती या हत्तीला गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याच्या गोलंदाजीवर हत्ती अचूक फटका खेळून चेंडू लांब पाठवत आहे. हे देखील वाचा- Fack Check: विड्याच्या पानाचे सेवन केल्यास कोरोना बरा होतो? महत्वाची माहिती आली समोर

व्हिडिओ-

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेमका कोणत्या राज्यातील आहे? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. परंतु, हा व्हिडिओ दक्षिण भारतातला असावा, असा अंदाज लावला जात आहे.