Fack Check: विड्याच्या पानाचे सेवन केल्यास कोरोना बरा होतो? महत्वाची माहिती आली समोर
BetelNut (Photo Credit: Twitter)

भारतामध्ये कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट धुमाकूळ घालत असतानाच आता तिसरी लाट देखील अटळ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावरून वैयक्तिक पातळीवर देखील लोक कोरोनापासून बचाव करत असल्याचे पहायला मिळाले आहे. यामध्ये अनेक नैसर्गिक, घरगुती उपाय केले जात आहेत. याचपार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका बातमीत विड्याचे पानाचे सेवन केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. परंतु, या माहितीला वैज्ञानिक आधार नसल्याने पीआयबीने (PIB) ही बातमी फेटाळून लावली आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, एका हिंदी वृत्तपत्रात कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपाय सांगितला आहे. त्यानुसार, विड्याचे पानाचे सेवन केल्याने कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकते. एवढेच नव्हेतर, कोरोना रुग्णही बरा होऊ शकतो असाही दावा करण्यात आला आहे. परंतु, विडयाच्या पानाचे सेवन केल्याने कोरोनापासून बचाव किंवा रुग्ण बरा होतो, असा कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे पीआयबीने सांगितले आहे. यामुळे ही संपूर्ण माहिती खोटी असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. हे देखील वाचा- Fact Check: कोविड-19 चे केवळ कारण 5G नेटवर्क टेस्टिंगमुळे लोकांचा मृत्यू? PIB ने केला व्हायरल ऑडिओ क्लिपचा खुलासा

ट्वीट-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर चुकीच्या माहितीचा प्रसारही वाढला आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्या नागरिकांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही बातमीची पडताळणी केल्या शिवाय पुढे पाठवणे धोकादायक ठरू शकते, याची आपण काळजी घेतली पाहिजे.