Alag Mera Yeh Rang Hain Song: जागतिक महिला दिनानिमित्त अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित; गायनातून दिले Acid हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन (Video)
Alag Mera Yeh Rang Hain Song (Photo Credit : Youtube)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis), या राजकीय तसेच संगीत विश्वातही नेहमीच चर्चेत असतात. अमृता फडणवीस जशा फॅशनिस्टा आहेत, तशाच त्या एक गायिकाही आहेत. त्यांच्या गाण्यांचे अनेक व्हिडीओ आपण याआधी पहिले आहेत. आताही जागतिक महिला दिनाचे (International Womens Day) औचित्य साधून अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. अलग मेरा ये रंग है (Alag Mera Yeh Rang Hain) असे या गाण्याचे नाव असून, टी-सीरीज तर्फे ते प्रदर्शित करण्यात आले आहे. सध्या सोशल मिडियावर हे गाणे व्हायरल होत असून, त्याला आतापर्यंत अडीच लाखाखून अधिक व्हूज मिळालेले आहेत.

'अलग मेरा ये रंग है' हे गाणे स्त्रियांना समर्पित केले आहे. यामध्ये एका नर्तिकेची छोटीशी कहाणी दाखवण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याने या नर्तिकेवर अॅसिड हल्ला होता. या अपघातातून सतःला सावरून ही नर्तिका कसा आपला वेगळा रंग मांडते ते या गाण्यात दाखवण्यात आले आहे. अशा प्रकारे अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अमृताजींनी हे गाणे गायले आहे.

या गाण्यासाठी अमृता फडणवीस यांनी आपल्या इंस्टाग्रामवर 'Face can be destoryed but not the soul' अशी या टॅगलाईन वापरली आहे. कामोद सुभाष यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून, या नवीन गाण्याचे बोल अभिजीत जोशी यांनी लिहिले आहेत. राजीव वालिया यांनी हा व्हिडीओ दिग्दर्शित केला आहे. (हेही वाचा: Video : ‘मस्तानी हो गई' गाण्यावर अमृता फडणवीस यांचा नृत्याविष्कार)

दरम्यान याआधीही अनेकवेळा टी सिरीजने अमृता यांच्या काही गाण्यांची निर्मिती केली होती. टी सिरीजच्या MixTape Season 2 मध्ये अमृता फडणवीस आणि बी. प्राक (B Praak) यांना गाण्याची संधी देण्यात आली होती. तर दोन वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेले ‘फिर से’ गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला अमृता फडणवीस यांनी आपला आवाज दिला होता. टी सीरीज आणि अमृता यांचे ‘तेरी बन जाऊंगी’ (Teri Ban Jaungi) हे गाणेही काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाले होते.