Altina Schinasi's 116th Birthday Google Doodle: आयकॉनिक Cat-Eye Glasses च्या निर्मात्या अल्टिना शिनासी च्या 116 व्या जन्मदिना निमित्त खास गूगल डूडल
Goodle Doodle | Google Homepage

गूगलच्या होमपेजवर  (Google Homepage)आज (4 ऑगस्ट) अल्टिना शिनासी (Altina Schinasi) यांच्या 116 व्या जयंती निमित्त खास गूगल डूडल साकारण्यात आले आहे. Altina Schinasi या अमेरिकन आर्टिस्ट आणि डिझायनर होत्या. त्यांचं टेक्स्टाईल, सिरॅमिक आणि ज्वेलरी क्षेत्रामध्ये विशेष योगदान आहे. Altina Schinasi यांनीच 1940 मध्ये Harlequin cat-eye glasses डिझाईन केले होते. Harlequin cat-eye glasses ची खासियत त्याच्या खास आकारामध्ये आहे. बदामाच्या आकाराच्या फ्रेम्स ज्या टोकाला निमुळत्या होतात असा त्यांचा अंदाज आहे. Venetian masquerade masks मधून त्यांना ही प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं जातं.

Schinasi यांच्या आर्ट वर्क मध्ये बोल्ड कलर्स, भौमितीय आकारांचा समावेश असतो. रंग आणि टेक्चर यांचा योग्य वापर करण्यावर त्याची मास्टरी होती. नेटिव्ह अमेरिकन आर्ट, आफ्रिकन आर्ट, मॉर्डनिस्ट आर्ट यांचा त्यांच्या कलेवर प्रभाव होता.

आजच्याच दिवशी 1907 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. अमेरिकेतील मॅनहॅटन भागात Salonica आई आणि Sephardic Jewish Turk असलेल्या बाबांच्या पोटी तिने जन्म घेतला. Schinasi यांनी पॅरिसमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला आणि अमेरिकेला परतल्यानंतर, तिने न्यूयॉर्कमधील आर्ट स्टुडंट्स लीगमध्ये कलेचा अभ्यास केला आणि फिफ्थ अव्हेन्यूवरील अनेक स्टोअरमध्ये विंडो ड्रेसर म्हणून काम केले. नक्की वाचा: Dr Mario Molina 80th Birthday Google Doodle: मारिओ मोलिना यांच्या 80 व्या जन्मदिनानिमित्त गूगलची खास डूडल द्वारा मानवंदना .

Ms. Schinasi यांना Lord & Taylor American Design Award ने 1939 साली गौरवण्यात आले होते. त्यांची दखल तेव्हाची प्रसिद्ध मॅगझीन Vogue आणि Life यांनी देखील घेतली होती.