Mario Molina | Google

मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ मारिओ मोलिना (Dr Mario Molina) यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त गूगकडून आज (19 मार्च) खास डूडल साकरण्यात आलं आहे. Dr Mario Molina यांनी सरकारकडून ओझोन लेयरच्या (Ozone Layer) संरक्षणाकरिता एकत्र यावं याकरिता विशेष प्रयत्न करण्यात आले होते. त्यांना 1995 साली नोबेल पुरस्कारानेही (Nobel Prize in Chemistry) गौरवण्यात आले आहे. मानव, वनस्पती आणि वन्यजीवांना हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली रसायने पृथ्वीच्या ओझोनच्या थराची कशी झीज करतात हे समोर आणणार्‍या शास्त्रज्ञांपैकी एक डॉ. मारिओ मोलिना आहेत.

Mario Molina यांचा जन्म 19 मार्च 1943 रोजी मेक्सिकोच्या मेक्सिको सिटी येथे झाला. मारियो मोलिना यांना chlorofluorocarbon gases किंवा CFCs पासून पृथ्वीच्या ओझोन थराला असलेला धोका शोधण्यात त्यांच्या भूमिकेसाठी 1995 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

लहानपणी, Mario Molina यांना विज्ञानाची इतकी आवड होती की त्यांनी आपले बाथरूम तात्पुरत्या प्रयोगशाळेत बदलले होते. त्यांनी मेक्सिकोच्या नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीमधून रासायनिक अभियांत्रिकीची पदवी आणि जर्मनीतील University of Freiburg तून अ‍ॅडव्हान्स डिग्री मिळवली होती.

अभ्यास पूर्ण केल्यानंतर, पोस्ट डॉक्टरल रिसर्च साठी ते अमेरिकेमध्ये आले. तेथे त्यांनी University of California, Berkeley आणि Massachusetts Institute of Technology मध्ये शिक्षण घेतले. नक्की वाचा: Marie Tharp Google Doodle: मेरी थार्प यांच्या स्मरणार्थ गूगलच्या होमपेजवर झळकलं अ‍ॅनिमेटेड गूगल डूडल .

7 ऑक्टोबर 2020 रोजी, Molinaयांचे मेक्सिकोमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. Sustainable World चं त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी मेक्सिको मध्ये The Mario Molina Center, हे रिसर्च इन्स्टिट्युट उभारण्यात आले आहे.