Newaskar Petrol Pump | ( (Photo Credits: Twitter)

पेट्रोल, डिझेल दर (Petrol Diesel Rate) वाढ हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. संपूर्ण भारतभरात वाढत्या इंधन दराने नागरिकांना मेटाकुटीस आणले आहे. आता तर चक्क पेट्रोल पंपचालकही या दरवाढीने हैराण झाले आहेत. त्यांनी ग्राहकांना सावधानतेचा इशारा देण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगर (Ahmednagar ) येथील नेवासकर पेट्रोल (Newaskar Petrol Pump) पंपावर लावण्यात आलेली एक पाटी सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच व्हायरल झाली आहे. या पाटीवर वाढत्या पेट्रोल दरावरुन ग्राहकांना चक्क इशाराच देण्यात आला आहे. या पाटीवर नेवासकर पेट्रोल पंप असा उल्लेख आहे खरा. मात्र, ही पाटील नेवासकर पेट्रोल पंप व्यवस्थापनानेच लावली आहे याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. लेटेस्टली मराठीही याची पुष्टी करत नाही.

दरम्यान, नेवासकरांच्या पेट्रोल पंपावरील व्हायरल झालेल्या पाटीला सोशल मीडियावर मात्र जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत अनेकांनी ही पाटी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अनेकांनी शेअर तर अनेकांनी लाईक केलीआहे. यावर येत असलेल्या प्रतिक्रियाही तितक्याच मजेशीर आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर नेवासकर पेट्रोल पंप अनेकांच्या दृष्टीने चर्चेचाच विषय ठरला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अहमदनगर शहरात आज पेट्रोल 120 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. त्यामुळे वाहनात पेट्रोल भरायचे की नाही या संभ्रमात ग्राहक आढळून येत आहे. परिणामी ग्राहकांची ही आवस्था बघून पेट्रोल पंपावर चक्क एक पाटीच झळकली. या पाटीत स्पष्ट म्हटले आहे की, 'पेट्रोलचे दर स्वत:च्या जबाबदारीवर पाहावेत, छातीत कळ आल्यास पंप मालक जबाबदार नाही.' वरवर पाहता हा विनोद वाटत असला तरी वाढत्या इंधन दरामुळे ग्राहक खरोखरच हवालदिल झाले आहेत. (हेही वाचा, पुणे पोलीस वापरणार पुणेरी पाट्यांचा फॉर्म्युला, पुणेकरांना देणार शहाणपणाचा सल्ला)

ट्विट

सांगितले जात आहे की, नेवासकर पेट्रोल पंपावर काम करणारे एक कर्मचारी रसिकलाल बोरा यांनी ही पाटी लिहीली आहे. रसिकलाल हे पाठिमागील अनेक वर्षांपासून पंपावर कामकरतात. पंपावरील पाटीवल पाठीमागील अनेक वर्षांपासून ते प्रतिदिन एक सुविचार लिहीत असतात. कधी कधी वर्तमान स्थितीवर आधारीत वेगवेगळे संदेशही पाटीवर झळकतात. वाढते इंधन दर यावरुन त्यांनी लिहीलेली वास्तवदर्शी पाटी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.