Wuhan Party After COVID 19 (Photo Credits: Twitter)

चीन (China) मधील हुबेई (Hubei) प्रांतामधील वुहान (Wuhan) येथून सुरु झालेला कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग अर्ध्याहुन अधिक जगाच्या डोक्याला ताप झाला आहे. कोट्यावधी लोकांंना घरी बसायला भाग पाडलेल्या, लाखो लोकांंचा बळी घेतलेला हा विषाणु कसा बरा होणार याविषयी अद्याप तरी काही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र आता जिथुन हा कोरोना सुरु झाला होता तिथली जनता पार्टीच्या मूड मध्ये दिसुन येत आहे, वुहान च्या माया बीच (Maya Beach) वॉटरपार्क मध्ये अलिकडेच एका म्युझिक कॉन्सर्ट (Music Concert)  चे आयोजन करण्यात आले होते ज्यात हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते, या कॉन्सर्ट चा एक व्हिडिओ AFP या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये हजारोच्या संख्येने वॉटपार्कमधील पूलमध्ये लोक एन्जॉय करताना दिसून येत आहेत. यामध्ये कोणीही मास्क घातलेला दिसत नाही.

अधिक माहितीनुसार, वुहान मधील वॉटरपार्क मध्ये कॉन्सर्टसाठी एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोकांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंग चा मात्र फज्जा उडाला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओ आणि फोटो मध्ये आपण प्रत्यक्ष या पार्टी मधील बेजबाबदार पणा पाहु शकता.

वुहान Water Park Music Concert Video (AFP)

दरम्यान, वुहान मध्ये 68 हजार कोरोना रुग्ण होते.4,512  जणांचा मृत्यू झाला होता मात्र आता वुहान आणि एकुणच चीन मध्ये परिस्थिती सुधारली आहे. एप्रिल मध्येच वुहानमधील लॉकडाउन संपवण्यात आला होता. मे महिन्यानंंतर या भागात कोरोनाचा एकही नवा रुग्ण न आढळल्याचे सांगण्यात येतेय.