कोरोना व्हायरसने (Coronavirus) चीनसह संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायसरमुळे लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 2300 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 70 हजाराहून अधिक लोकांना कोरोना व्हायसरची लागण झाल्याचे समोर आले आहे. एकट्या चीनमध्ये या व्हायरसचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी आणीबाणी देखील घोषीत करण्यात आली आहे. तसेच कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अनेक उपाय योजना आखल्या जात आहेत. दरम्यान, एका तरूणाने कोरोना व्हायरसपासून स्वताचे बचाव होण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. विमानातून प्रवास करताना संबंधित व्यक्तीने स्वताला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून घेतल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानातील आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी एका प्रवाशांनी स्वताला चक्क प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून घेतले आहे. दरम्यान, विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशाने हा व्हिडिओ शूट केला आहे. तसेच अलिसा नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. काही लोकांनी या व्हिडिओला दाद दिली तर, काही लोकांनी तरुणाची खिल्ली उडवली आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Italy: इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे एकाचा मृत्य; इतर अनेक देशांत पोहोचले विषाणू
भारताचे शेजारी राष्ट्र असलेला चीन सध्या कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहे. केवळ चीनच नव्हे तर जगभरातील अनेक देशांसमोर या संकटाने आव्हान निर्माण केले आहे. चीनमधील वुहान शहरातून उगम पावलेल्या या कोरोना व्हायरसने आतापर्यंत विविध देशांतील 23 हजारांहून अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे. जगभरातील विविध 20 देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, तब्बल 70 हजारहून अधिक लोकांना या रोगाची लागण झाल्याचा आकडा प्रसारमाध्यमांनी दिला आहे.
ट्विट-
Currently behind me on the plane. When you super scared of #coronavirus #COVID2019 pic.twitter.com/iOz1RsNSG1
— alyssa (@Alyss423) February 19, 2020
कोरोना व्हायरस याची लक्षणे म्हणजे प्रामुख्याने सर्दी, तापाची लक्षणं सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. 9 जानेवारी दिवशी WHO ने वुहानमध्ये यापूर्वी कोरोना विषाणूच्या अज्ञात प्रकाराने पसरवलेल्या विषाणू मुळे होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
सापाने गिळलेला टॉवेल डॉक्टरांनी कसा काढला, पहा व्हायरल व्हिडिओ : Watch Video
यामध्ये सामान्य सर्दी-पडसे ते सार्स सारख्या गंभीर आजाराची लक्षणे दिसून येत आहेत.