Man Rents Jail Cell: बंगलोरसारख्या गजबजलेल्या शहरात, तुमच्या आवडीचे भाड्याचे घर शोधणे खूप अवघड आहे. अनेक लोक नोकऱ्यांसाठी शहरात येत असल्याने भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तांची मागणी पूर्ण करण्यासाठी शहराची धडपड सुरू असते. एका व्यक्तीने त्याच्या बेंगळुरूमधील नवीन-पूर्णपणे सुसज्ज मालमत्तेबद्दल बोलण्यासाठी ट्विटरची निवड केली. त्यांनी भाड्याने घेतलेली मालमत्ता ही जेल सेल आहे.
मंथन गुप्ता या ट्विटर वापरकर्त्याने एका छोट्या जागेचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एक बेड, एक लहान कपाट आणि एक टेबल आहे. अत्यंत गजबजलेल्या भागात धातूच्या पट्ट्यांसह एक छोटी खिडकी आणि दरवाजा दिसत आहे. मंथन यांनी या पोस्टला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, "शेवटी बेंगळुरूमध्ये पूर्ण सुसज्ज घर मिळाले. गेट्ड सोसायटी आणि 24×7 सुरक्षा." सोशल मीडिया वापरकर्त्यांना हे जेल सेल असल्याचं समजलं. त्यानंतर नेटीझन्सनी या पोस्टवर उपरोधिक आणि विनोदी कमेंट केल्या आहेत. (हेही वाचा - Delhi Metro Girl Photos Viral: 'दिल्ली मेट्रो गर्ल'चे टिनी ब्रा आणि मिनी स्कर्टमधले फोटो पुन्हा व्हायरल; नेटिझन्सने दिल्या संतप्त प्रतिक्रिया)
यातील एका यूजर्सने म्हटलं आहे की, “जो कोणी तिथे राहतो त्याला खोलीत सूर्यप्रकाश मिळणे देखील भाग्यवान आहे.” दुसर्या व्यक्तीने दावा केला आहे की, हे माझ्या खोलीपेक्षा फक्त 20 टक्के लहान आहे.
Finally found a fully furnished home in blr. Gated society and 24x7 security. pic.twitter.com/snSQIr9iPC
— Manthan Gupta (@manthanguptaa) March 31, 2023
दुसर्या युजरने लिहिले, “मला वाटते तुरुंग हा एक परिवर्तनकारी अनुभव असू शकतो. हे लोकांना अधिक केंद्रित बनविण्यात मदत करू शकते, त्यांना आकारात परत येण्यास आणि कदाचित काही खूप सकारात्मक सवयी विकसित करण्यात मदत करू शकते. प्रामाणिकपणे, कोणीतरी लोकांना स्वेच्छेने जेल सेल भाड्याने देण्याचा मार्ग तयार केला पाहिजे."