दिल्ली: कुंपण ओलांडून सिंहाच्या पिंजऱ्यात तरुणाने घेतली उडी; त्यानंतर जे घडले... (Video)
सिंहाच्या पिंजऱ्यात तरुणाची उडी (Photo Credits: ANI)

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयामध्ये (Delhi Zoo) चित्रपटामध्ये शोभेल अशी घटना घडली आहे. एका व्यक्तीने मागचा पुढचा कोणताही विचार न चक्क सिंहाच्या (Lion) पिंजऱ्यामध्ये उडी घेतली. मात्र त्यानंतर प्रसंगावधान राखून या व्यक्तिला त्वरित बाहेर काढण्यात आले. अशा प्रकारे एक मोठी उर्घाटन होता होता टळली. रेहान खान असे या व्यक्तीचे नाव असून, तो 28 वर्षांचा आहे. रेहानचे मानसिक संतुलन ठीक नसल्यामुळे त्याच्याकडून हे कृत्य घडले असल्याचे समोर आले आहे. रेहान मुळचा बिहारचा राहिवासी आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ -

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रेहान दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने चक्क सिंहाच्या कुंपणामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबत असणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणालाही न जुमानता तारेच्या कुंपणावरून आत उडी मारली. महत्वाचे म्हणजे त्यानंतर तो सिंहाजवळ आरामात बसला होता. या चालू असलेल्या गोंधळाच्या आवाजाने सुरक्षा कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष गेले आणि त्यांनी कुंपणात उडी घेऊन रेहानचा जीव वाचवला. त्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनाही दिली. (हेही वाचा: मुंबईकरांनो सावधान! राणीच्या बागेत होतंय बिबट्याचे आगमन, जून 2019 पासून घेता येणार भेट)

प्राणीसंग्रहालयात एका बाजूला तारेचे कुंपण होते, तर दुसऱ्या बाजूला लाकडाचे कुंपण घातले होते. रेहान लाकडाच्या कुंपणावर चढून आत उतरला होता. रेहान मानसिक दृष्ट्या ठीक नसल्यामुळे हे कृत्य घडले असल्याचे सांगण्यात आले आहे.