Viral Video: नदीमध्ये अडकलेल्या हरणाच्या एका चुकीमुळे झाला मगरीचा शिकार, व्हिडिओ पाहून तुमचाही होईल थरकाप
Deer Viral Video (Photo Credits: Twitter)

सध्या सोशल मिडियावर प्राण्यांचे अनेक मजेशीर, तितकेच अंगाचा थरकाप उडविणारे व्हिडिओज व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. हे व्हिडिओ नेटक-यांना देखील प्रचंड आवडत आहे. अनेकदा प्राणी आपल्यातील चपळपणा, चतुरपणामुळे एखाद्या मोठ्या प्राण्याचे भक्ष्य होण्यापासून कसे वाचतात हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. मात्र कधी कधी त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे त्यांना अनपेक्षितपणे एखाद्या प्राण्याचा शिकार व्हावे लागते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral VIdeo) होत आहे. या व्हिडिओमध्ये नदीमध्ये एक हरिण (Deer) अडकलेले दिसत आहे. त्याला भक्ष्य करण्याचा मार्गावर असलेल्या मगरीने (Crocodile) कशी संधी साधून त्याला आपले शिकार केले हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी प्रवीण अंगुस्वामी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करुन 'साहसी आणि मूर्खपणाच्या मध्ये एक पातळ रेषा असते, जी कधीही पार करता कामा नये' असे कॅप्शन दिले आहे.हेदेखील वाचा- Snake Viral Video: दोन विषारी सापातील लढाई पाहून तुम्हालाही सुटेल थरकाप; पहा संपूर्ण व्हिडिओ

हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल, यात एक हरिण नदीच्या मधोमध अडकले आहे. तेथून बाहेर पडण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत. मात्र त्याच्यापासून जवळ एक मगर पाण्यात बसून तो बाहेर पडण्याची वाट बघत आहे. मात्र काही वेळाने अचानक हरिण पाण्यात उडी मारतो आणि पटापट नदी पार करुन किना-यावर जाण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात अचानक योग्य संधीची वाट पाहत असलेली त्याच्यावर झडप घालते आणि हरिणाची शिकार करते.

या व्हिडिओला 1.5K व्ह्यूज मिळाले असून 23 जणांनी रिट्विट केले आहे. तर 188 जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.