Viral Video: केरळमधील नववधूने खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर केले खास फोटोशूट; Watch
Kerala bride photo shoot (PC - Instagram)

Viral Video: देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे रस्ते पाण्याने भरले आहेत. आपल्या शहरातील समस्या जगासमोर मांडणे प्रत्येकासाठी सोपे नसते, पण केरळमधील एका नववधूने फोटोशूट करून रस्त्यांची वाईट अवस्था प्रकाशझोतात आणली आहे. वास्तविक, केरळच्या वधूने रस्त्यांवरील पाण्याने भरलेले खड्डे दाखवण्यासाठी रस्त्यावरच फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. पाण्याने आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवर लाल रंगाचा शालू घालून फिरणाऱ्या नववधूंचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

आतापर्यंत या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लाल साडी परिधान केलेल्या वधूचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ एरो वेडिंग कंपनीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पारंपारिक पोशाखात रस्त्त्यावरून चालताना दिसत आहे. नववधू चालत असलेल्या रोडवर प्रचंड खड्डे दिसून येत आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलेलंही पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओ लाईक तसेच कमेंन्ट्स केल्या आहेत. (हेही वाचा -Paediatrician Viral Video: आग्रा मध्ये Mouth-to-Mouth Resuscitation देऊन डॉक्टरने दिले नवजात बालकाला जीवनदान; सोशल मीडीयामध्ये व्हिडिओ वायरल)

इंस्टाग्रामवर या व्हिडिओला आतापर्यंत 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. इन्स्टा वापरकर्त्यांनी वधू आणि वेडिंग फोटोग्राफरच्या कल्पना आणि सर्जनशीलतेचे कौतुक केले आहे. व्हिडिओशिवाय, फोटोग्राफरने खड्डे भरलेल्या रस्त्यावरून चालताना वधूचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.