बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर आता झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांचा आज अजित पवारांच्या एनसीपी (Ajit Pawar NCP) मध्ये पक्षप्रवेश झाला आहे. पक्षप्रवेशासोबतच झिशान यांना पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणूकीसाठी अजित पवारांनी उमेदवारी देखील जाहीर केली आहे. आज सकाळी एनसीपी कार्यालयामध्ये हा पक्ष प्रवेश झाला आहे. आता वांंद्रे पूर्व मध्ये झिशान यांची विधानसभा निवडणूकीमध्ये लढाई मविआ च्या वरूण सरदेसाई यांच्यासोबत होणार आहे. झिशान हे वांद्रे पूर्व भागातील विद्यमान आमदार आहेत. कॉंग्रेस मधून ते मागील टर्म मध्ये आमदार होते. परंतू मागील काही महिन्यांमध्ये कॉंग्रेस मधील आणि मविआ मधील कारभारावर त्यांनी सडकून टीका केली होती. त्यामुळे त्याच्या पक्ष प्रवेशाची चर्चा होती. NCP Second List of Candidates for Maharashtra Assembly: अजित पवारांकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर; सुनील टिंगरे, सना मलिक सह निशिकांत पाटील यांच्या नावाचा समावेश .
झिशान यांनी सध्या हा क्षण भावूक करणारा आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष प्रवेशाच्या वेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे यांचे आभार मानले आहेत आणि जनतेच्या प्रेमावर आपण पुन्हा जिंकून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वीच झिशान यांचे वडील आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची झिशान यांच्याच कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या झाली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. दरम्यान झिशान देखील मारेकर्यांच्या हिटलिस्ट वर होते अशी माहिती समोर आली आहे. Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींचा लेक Zeeshan Siddique देखील हिटलिस्टवर? आरोपीच्या मोबाईल मध्ये सापडला फोटो .
#WATCH | Mumbai: After joining NCP, Zeeshan Siddiqui says, "This is an emotional day for me and my family. I am thankful to Ajit Pawar, Praful Patel, Sunil Tatkare for believing in me in these tough times. I have got the nomination from Bandra East, I am sure that with the love… https://t.co/F0TZJgwPhL pic.twitter.com/KG39RFsSQn
— ANI (@ANI) October 25, 2024
मविआ वर टीका करणारी पोस्ट
काही दिवसांपूर्वी मविआ ने वरूण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व चा उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर झिशान ने खोचक पोस्ट केली होती. “रिश्ता उसी से रखो जो इज़्ज़त और सम्मान दे, मतलब की भीड़ बढ़ाने का कोई फ़ायदा नहीं।” असं म्हणत आता जनताच निर्णय घेईल असं म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर झीशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया देताना "महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार जाहीर केले आणि काँग्रेसचा विद्यमान आमदार असलेली जागा शिवसेनेला (यूबीटी) दिली हे अत्यंत दुर्दैवी आहे. काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडीचे नेते गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात होते. पण कठीण काळात अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर विश्वास ठेवला. माझ्या वडिलांचे अपूर्ण स्वप्न आता मी पूर्ण करणार आहे आणि या लढ्यात विक्रमी फरकाने जिंकणार असल्याचे तो म्हणाला आहे.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकांच्या वेळेस झिशान यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कॉंग्रेसने कारवाई करत त्यांना पक्षातून काढले होते. झिशान सोबतच आज माजी खासदार संजयकाका पाटील आणि इस्लामपूरचे नेते निशिकांत भोसले पाटील यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे.