कुरार: प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने मैत्रिणीचा फोटो विवस्त्र करुन ठेवला व्हॉट्सअॅप स्टेटसला
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

'लव्ह सेक्स और धोका' यावर चालणारी सध्याची प्रेमप्रकरण ही जास्त काळ न टिकणारी आणि सूडबुद्धीची बनत चालली आहे. त्यामुळे हीच सूडाची भावना मनात ठेवून गुन्हा करणारे कित्येक प्रेमीयुगूल आपल्याला पाहायला मिळत आहे. या प्रकारात सोशल मिडियाचा वापर करुन सायबर क्राईम करणारे गुन्हे ही वाढत चालले आहे. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रेमसंबंध तोडल्यामुळे सूडाची भावना मनात ठेवून आपल्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो विवस्त्र करुन व्हॉट्सअॅप स्टेट्स वर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुरार (Kurar) पोलिसांनी 20 वर्षीला तरुणाला अटक केली आहे.

कुरार येथे राहणा-या या तरुणाचे पीडित मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करु लागली होती. याबाबत तरुणाने तिला विचारले असात तिने प्रेमसंबंध पुढे सुरु ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे तोच राग मनात ठेवून या आधी काही दिवसांपूर्वी हे दोघे आक्सा बीचवर फिरायला गेले होते. तेथे त्याने काढलेला पीडितेचा आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला. हेदेखील वाचा- अमरावती: एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीची हत्या; जमावाकडून आरोपीस चोप

याबाबत त्या तरुणीने त्याला जाब विचारला असता आपल्या सोबत प्रेमसंबंध तोडल्यास हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल करु अशी धमकी आरोपीने दिली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करुन या तरुणाला कुरार मधून अटक केली.

या प्रकरणी कुरार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.