मुंबईकर गारठले तापमान 11 अंश तर पुणे येथे तापमानाचा पारा 5.1 पर्यंत घसरला (फोटो सौजन्य-ट्वीटर)

राज्यातील तापमानात मोठा चढउतार बघायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात राज्यभरात कडाक्याची थंडी पडली. तसेच राज्यातील काही भागत ढगाळ वातावरण बघायला मिळालं. पण गेल्या दोन दिसांपासून पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढल्याचं दिसत आहे. २०२३ वर्षाच्या पहिल्याचं आठवड्यात राज्यात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना  हुडहूडी तर भरलीचं आहे पण राज्यातील विविध मुख्य शहरांमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याचं चित्र आहे. मुंबई, पुणे, नाशिक,कोल्हापुर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात कमालीची घसरण बघायला मिळाली आहे. तरी नवीन वर्षाच्या पहिल्याचं आठवड्यात राज्यात हुडहूडी भरणारी थंडी जाणवली. हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. एवढचं नाही तर गेल्या ९ वर्षात हवामान विभागाकडून सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

 

विदर्भात तर चक्क पारा 7 अंश सेल्सिअसवर पोहचला असुन विदर्भ अक्षरशा गारठला आहे. दरम्यान विदर्भात थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात पुढील 2 दिवसात काही ठिकाणी थंडीची लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी २०१४ मध्ये विदर्भात एवढ्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली होती पण आता तब्बल ९ वर्षानंतर विदर्भातील निच्चांकी तापमानाचे रेकॉर्ड मोडत नवा निच्चांकी तापमानाचा विक्रमचं गाठला आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Winter Update: महाराष्ट्र गारठला! राज्यात निच्चांकी तापमानची नोंद, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज)

 

महाराष्ट्रा प्रमाणेचं देशातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. पंजाबच्या अनेक भागात दाट धुके कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये अचानक थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात उत्तर-पश्चिम भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.