Maharashtra Winter Update: महाराष्ट्र गारठला! राज्यात निच्चांकी तापमानची नोंद, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Winter | (Photo Credits: PTI)

देशभऱ्यात नव्या वर्षात चांगलीचं कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. अगदी आठवड्याच्या सुरुवातीपासून थंडीचा जोर वाढला आहे. निच्चांकी तापमान रोज जणू एक नवा विक्रमचं गाठत आहे. २०२३ वर्षाच्या पहिल्याचं आठवड्यात राज्यात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना  हुडहूडी तर भरलीचं आहे पण राज्यातील विविध मुख्य शहरांमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याचं चित्र आहे. मुंबई, पुणे, नाशिक,कोल्हापुर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात कमालीची घसरण बघायला मिळाली आहे. तरी नवीन वर्षाच्या पहिल्याचं आठवड्यात राज्यात हुडहूडी भरणारी थंडी जाणवली. हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तरी येणारे पुढील दोन आठवडे थंडीचा जोर कायम असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

 

अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. राज्यात कितीही थंडी जाणवली तर मुंबईत समुद्रामुळे फारशी थंडी नसते. तरी यावेळी मुंबईत देखील विक्रमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई भागात सर्वात कमी तापमानाची नोंद गेल्या तीन दिवसात होत आहे. तर त्याच बरोबर पश्चिम मुंबई, मध्य मुंबईसह मुंबई उपनगर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे. तरी मुंबईसह उपनगरात सकाळी आणि संध्याकाळी कमाल तापमानाची नोंद होत आहे. (हे ही वाचा:- Pune Water Cut Update: पुण्यामध्ये 5, 6 जानेवारीला पाणीपुरवठा खंडीत राहणार)

 

देशातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. पंजाबच्या अनेक भागात दाट धुके कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये अचानक थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात उत्तर-पश्चिम भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.