
Wildlife Lovers Hold Hunger Strike Against Satish Bhosale: बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील सतीश उर्फ खोक्या भोसले (Satish alias Khokya Bhosale) याच्याविरोधात मुंबई येथील आझाद मैदानावर (Azad Maidan) वन्यजीव प्रेमींचे उपोषण सुरू आहे. SIT लावून खोक्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे. शिरूर कासार येथील खोक्या उर्फ सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा करण्यात येत आहे. सतीश भोसलेवर हरणांची तस्करी केल्याचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात त्याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली होती. सुरेश धस हे सतीश भोसले याची पाठराखण करत असल्याचा आरोप देखील उपोषणकर्त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा अनेक वादांनी गाजत असताना शिरूर कासार येथील सामान्य लोकांवर गुंडगिरीच्या माध्यमातून दहशत तयार करणाऱ्या तसेच वन्यजीव प्राण्यांची हत्या करणारा सतीश भोसले याला बीड पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी त्याला 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (हेही वाचा -Satish Bhosale Arrested: 'खोक्या' नावाने प्रचलित, सतीश भोसले यास अटक; शेवटचे लोकेशन प्रयागराज)
दरम्यान, वन विभागाने भोसले राहत असलेल्या ठिकाणी वनविभागाची जमीन असल्याचे सांगत त्याचे घर जमीनदोस्त केले होते. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी देखील अनेक आरोप करून आम्हाला बेघर केलं असल्याचे कारण पुढे करत बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केले. गेल्या आठवड्यात सुरेश धस यांनी सतीश भोसलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. तसेच त्यांना सहकार्य करण्याचे देखील आश्वासन दिले होते. (हेही वाचा, Santosh Deshmukh Murder Case: 'धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली खंडणीच्या संदर्भात बैठक'; भाजप आमदार Suresh Dhas यांचा मोठा आरोप (Video))
तथापि, सतीश भोसलेने ढाकणे परिवाराला बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसलेला अटक करण्यात आली. या व्हिडिओनंतर गावातील अनेकांनी त्याच्याविरोधात तक्रार केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील सतीश भोसले हे प्रकरण सध्या चांगलेचं चर्चेत आले आहे.