Khokya Alias Satish Bhosale | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Beed Khokya Bhai Arrested: सतीश उर्फ खोक्या भोसले (Khokya Alias Satish Bhosale) अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पाठिमागील काही दिवसांपासून तो फरार होता. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत खोक्या (Khokya Bhosale) यास प्रयागराज येथून अटक करण्यात आली. भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. ज्यातील काही अतिशय गंभीर आहेत. वन्य प्राण्यांची शिकार, अंमली पदार्थांची तस्करी आणि खंडणीसह अनेक आरोपही त्याच्यावर आहेत. एका व्यक्तीस निर्दयी मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला होता आणि बीड पोलिसांना तो विविध गुन्ह्यांमध्ये हवा होता.

महाराष्ट्र पोलीस प्रयागराजच्या वाटेवर

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, सतीश उर्फ खोक्या भोसले पाठिमागील काही दिवसांपासून फरार होता. विविध गुन्ह्यांमध्ये तो बीड पोलिसांना हवा होता. त्यामुळे बीड पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर प्रयागराज येथे त्याचे शेवटचे लोकेशन सापडले. त्यामुळे मोठ्या शथापीने त्याला तेथून ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्याला दुसऱ्या राज्यात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यास महाराष्ट्रात आणण्यासाठी ट्रान्सिट रिमांड घ्यावी लागते. त्यासाठी आमची टीम तेथे पोहोचली आहे. स्थानिक कोर्टाची परवानगी घेतल्यानंतर त्याला येथे आणले जाईल. (हेही वाचा, Santosh Deshmukh Murder Case: 'धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली खंडणीच्या संदर्भात बैठक'; भाजप आमदार Suresh Dhas यांचा मोठा आरोप (Video))

खोक्याच्या घरात गांजा आणि वन्य प्राण्यांचे सुके मांस

खोक्या उर्फ सतीश भोसले पाठिमाकील अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा होता. विविध प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली होती. ज्यामध्ये जवळपास 600 ग्रॅम सुका गांजा साठवणूक केलेल्या स्थितीत आढळून आला होता. काळ्याबाजारात या गांजाची किंमत 7,200 रुपये असू शकते, असे स्पष्ट झाले आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या घरातून वन्य प्राण्यांचे वाळलेले मांसही हस्तगत करण्यात आले. (हेही वाचा, Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना धक्का, मंत्रिमंडळातील पहिली विकेट; अजित पवारांना 'उशीरा सूचलेले शहानपण')

वनविभागाची तक्रार खोक्यावर गुन्हा

खोक्या उर्फ सतीश भोसले याच्यावर मोर, हरीण, काळविट, ससे यांसारख्या वन्य प्राण्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. वन विभागाने त्याच्याविरोधात तक्रारही असून, त्या तक्रारीवरुन त्याच्यावर NDPS कायद्याच्या कलम 20 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर कासार पोलीस स्टेशन दप्तरीही त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये त्याचा पाय खोलात जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, खोक्या भोसले यांचे अनेक ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये काही व्हिडिओंमध्ये खोक्या एका असहाय व्यक्तीस बेदम मारहाण करताना दिसत आहे तर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो पैशांचे बंडल आपल्या कारमध्ये चालकाच्या आसनासमोरील बोनेटवर ठेवताना दिसत आहे. आणखी एका व्हिडिओत तर तो चक्क पैसे उधळताना आढळून येतो. एका व्हायरल झालेल्या कथित ऑडीओ क्लिपमध्ये भाजप आमदार सुरेश धस हे खोक्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा अत्यंत मनोभावेपणे देताना ऐकायला मिळतात. लेटेस्टली मराठी या ऑडिओ आणि व्हिडिओची पुष्टी करत नाही.