
Pune Crime News: पुण्यात (Pune) गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कौटुंबिक वादावरुन एका व्यक्तीने पत्नीचा गळा चिरून तीचा खून (Murder) केला आहे. या घटनेनंतर आरोपी पती पुणे पोलीस ठाण्यात हजर झाला. या धक्कादायक घटनेमुळे पुणे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसा ठाण्यात जावून आपल्या पत्नीच्या खून केल्याची कबुली दिली आहे. हा प्रकार बघून पोलीसही चक्रावले आहे. बुधवारी रात्री त्यांनी हत्या केल्याची माहिती पोलीसांना दिली. धारधार वस्तूने पत्नीचा गळा चिरला तीचा जागीच मृत्यू झाला.
पुणे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नी मध्ये काही दिवसांपासून सतत भांडण सूरू होतं. लक्ष्मी केशव सीताफळे असे या घटनेतील मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.तर केशव सीताफळे असे आरोपीचे नाव आहे. सततच्या कौटूंबिक वादाला कंटाळून आरोपीने पत्नीचा खून केला. धारधार शस्त्राने पत्नीचा गळा चिरला. या घटनेत तीचा जागीच मृत्यू झाला आहे. खून केल्यानंतर आरोपी चंदननगर पोलीस ठाण्यात गेला. तेथे पोलीसांना घटनेची कबुली दिली.
पोलीसांनी या घटनेची नोंद घेतली. घटनास्थळी दाखल झाले तेव्हा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्या जमिनीवर पडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. महिलेचा मृतदेह ताब्यात घेवून ससून रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. आरोपी केशववर पत्नीच्या खूनाचा आरोप दाखल झाला. पुणे पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे.