आज शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत शिवजयंतीचा (Shiv Jayanti 2020) कार्यक्रम साजरा झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीच्या कामावर भाष्य केलं. अजित दादा आपण आधीच एकत्र यायला हवं होतं. इतके वर्ष आपण उगाचचं दूर राहिलो. मधली वर्षे आपण उगाचचं वाया घालवली, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आता तिन्ही पक्ष एकत्र आल्याने जे काही चांगल करायचं आहे, ते करून दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला अनेक शिवभक्त तसेच शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
उद्धव ठाकरे उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करत असताना गर्दीतील एकाने शिवस्मारकासंदर्भात प्रश्न विचारला. यावर उद्धव ठाकरे यांनी हो सगळं बघतो. शिवनेरी आणखी कशी सजावयची याकडे आम्ही लक्ष देत आहोत, असं म्हणत त्यांनी संबंधित नागरिकाला हसून उत्तर दिलं. (हेही वाचा - Shiv Jayanti 2020: राज्यात शिवजयंतीचा उत्साह; शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांची मोठी गर्दी)
"आता जे काही आम्ही एकत्र आलेलो आहोत, आता आम्ही जे काही चांगलं करायचं आहे ते करून दाखविल्याशिवाय राहणार नाही. एवढं एक वचन, एवढी एक शपथ जिजाऊ आणि शिवरायांच्या साक्षीने घेतो."
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 19, 2020
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी शिव जन्मोत्सवाला नेहमी येत असतो. मात्र, पहिल्यांदाचं एवढी गर्दी पाहतोय. आता लोकांना रयतेचे राज्य आल्याची भावना वाटत आहे, असंही पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्याचा कायापालट आणि सुशोभिकरण करण्यासाठी 23 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं सांगितलं. तसेच मराठा आरक्षण आंदोलनात कायद्याच्या चौकटीत राहून शासकीय मालमत्तेचे नुकसान केलं नाही, असे गुन्हे मागे घेण्यात येतील असंही अजित पवार यांनी सांगितलं.