छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तारखेनुसार) संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी केली जात आहे. यावेळी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवनेरी किल्ल्यावर '101 शिवबा सलामी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी 51 मुली आणि ढोल पथकातील 50 विद्यार्थी, अशी 101 मुले रोमहर्षक संचलन आदिवासी नृत्याच्या माध्यमातून सादर करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे शिवनेरी किल्ल्यावर भेट देणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्तांनी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर रात्रीपासूनच गर्दी उसळी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे तारखेनुसार आज जयंती साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करुन मराठी जनतेच्या मनात स्वातंत्र्याची भावना चेतवली. 400 वर्षापूर्वी रोवलेल्या या बीजाचे पुढे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले. त्यामुळेच शिवभक्तांसाठी आजचा दिवस महत्वाचा मानला जातो. शिवनेरी किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या किल्ल्यावर हजारो शिवप्रेमी, शिवभक्त किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. तसेच ठिकठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली आहे. हे देखील वाचा- Shivaji Maharaj Jayanti 2020 Images: शिवजयंती निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शिवप्रेमींना महाराजांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी जाहीर केली जाते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी दिलेले योगदान अनेकांच्या लक्षात यावे, यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि गनिमी युक्तीने बलाढ्य माराठा सम्राज्य निर्माण केले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरिपेक्ष राजा होते. त्यांचा जात-पातला विरोध असून त्यांच्या सैन्यात अनेक जाती, धर्माचे लोक कार्यरत होते.