Shiv Jayanti 2020 Images and Wishes in Marathi: महाराष्ट्र राज्यात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्या छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) आज (19 फेब्रुवारी) दिवशी 390 वी जयंती आहे. राजे शहाजी आणि जिजाबाई यांच्या पोटी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. मग या दिवसाचं औचित्य साधून शिवभक्त जगभरात आज शिवजयंतीचा (Shiv Jayanti) जंगी सोहळा साजरा करत आहेत. रयतेचा राजा म्हणून मराठी माणसाचा मनामनात आदराचं स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं (Shivaji Maharaj Jayanti) औचित्य साधून त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि तमाम जगभरातील शिवभक्तांसोबत शिवजयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबूक, इंस्टाग्राम, हाईक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यासाठी आम्ही काही ग्रीटिंग्स, Wallpapers, HD Images बनवली आहेत. या मराठमोळ्या शुभेच्छापत्रांना व्हॉट्सअॅप स्टेट्स, फेसबूक मेसेंजरच्या माध्यमातून शेअर करून शिवजन्म सोहळ्याचा आनंद द्विगुणित करू शकता. Shiv Jayanti 2020 Marathi Wishes: शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश, Messages, Whatsapp Status, Greetings आणि शुभेच्छापत्रं शेअर करुन साजरा करा यंदाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या कथा नव्या पिढीला प्रेरणा देतात. हा शिवरायांच्या पराक्रमाचा वसा शिवजयंती निमित्त पुढच्या पिढीला देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणूनच किमान शिवजयंती दिवशी मेसेजच्या स्वरूपात त्यांचे विचार शेअर करण्यासाठी इथे क्लिक करा.
शिवजयंती 2020 मराठमोळे वॉलपेपर
महाराष्ट्र सरकारकडून 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया (Phalguna vadya Tritiya) शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) हा दिवस शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणून स्वीकारण्यात आला. त्यामुळे शासनाकडून दरवर्षी शिवजयंती साजरी करण्यासाठी 19 फेब्रुवारी दिवशी बॅंक हॉलिडे/ शासकीय सुट्टी जाहीर केली जाते.