Fire At Serum Institute: सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली का लावली? वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली शंका
Prakash Ambedkar (Photo Credit: ANI, PTI)

कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ (Covishield) लसीमुळे सध्या संपूर्ण देशासह जगाचे लक्ष असलेल्या पुण्यातील (Pune) सीरम इन्स्टिट्यूटला (Serum Institute) लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे. सुदैवाने, या आगीत कोणीही जखमी किंवा जीवीतहानी न झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या आगीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात थिणगी पडली आहे. दरम्यान, या आगीबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शंका व्यक्त केली आहे. तसेच ही आग लागली का लावली गेली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

नुकताच प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला होता. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीबाबत भाष्य केले आहे.“सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याची माहिती मला व्हॉट्सअॅपद्वारे मिळाली. पण ही आग लागली आहे की लावलेली आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या आगीची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी त्यावेळी केली आहे. हे देखील वाचा- Pune SII Fire Update: सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग नियंत्रणात, कोविड लस सुरक्षित- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीबाबात घातपाताचा संशय व्यक्त केला होता. सीरम इन्स्टिट्यूटला दुपारी दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. ज्या इमारतीला आग लागली. तिथे कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीचे काम चालत नव्हते. त्यामुळे लस सुरक्षित आहे, असे मुक्ता टिळक म्हणाल्या आहेत. तसेच ज्याठिकाणी आग लागली. त्या परिसरात कोरोना प्रतिबंधक लस बनवण्याचे काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटत आहे, असाही सशंय मुक्ता टिळक यांनी व्यक्त केला आहे.

सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर लागलेली ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीवर जवळपास दोन तासांनी नियंत्रण मिळण्यात आलं आहे.