पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (Pune Serum Institute of India) आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला. ही आग विझविण्यासाठी 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे ही आग आता नियंत्रणात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सांगितले. तसेच या आगीत अद्यापपर्यंत कुठलीही जीवितहानी नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून येथील बनविण्यात येणारी कोविड लसही (COVID Vaccine) सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
"देशातील लसीकरण मोहिमेत सीरमचा सिंहाचा वाटा असून त्याच संस्थेत आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार कोव्हिडची लस तयार करणाऱ्या विभागाला आग लागलेली नाही. बीसीजी लस तयार केली जाते तिथे आग लागली होती. ही आग नियंत्रणात आली असून एकूण सहा जणांना बाहेर काढण्यात यश आलं" अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.हेदेखील वाचा- Fire Breaks Out at SII: सीरमच्या मांजरी येथील प्लांट मधील आगीत कोणतीही जीवितहानी नाही, COVISHIELD देखील सुरक्षित; CEO Adar Poonawalla यांची माहिती
Six people have been rescued (from fire). Prima facie it seems that the fire was caused by an electric fault. The COVID vaccine is safe. I have not spoken to Adar Poonawalla till now: Maharashtra CM Uddhav Thackeray https://t.co/UcoW67qqsU
— ANI (@ANI) January 21, 2021
'विद्युत बिघाडामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच येथे नेमकं काय काम सुरु होतं याची माहिती संपूर्ण आग विझल्यानंतर येईल असंही ते म्हणाले.'
"अदर पूनावाला यांच्यासोबत माझं काही बोलणं झालेलं नाही. मी प्रशासकीय यंत्रणेकडून माहिती घेतली. सर्व शांत झाल्यावर मी सगळ्यांशी संवाद साधणार आहे. कोणाला फोन करुन त्रास दिलेला नाही. आग विझवण्याचं काम पूर्ण झालं की आपल्याला माहिती मिळेल. नुसतं मी फोन करुन काहीच होणार नाही," असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
यावेळी उद्धव ठाकरेंना विरोधक यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांच्याकडे ही माहिती कशी येते? सर्जिकल स्ट्राइक वैगेरे इतर गोष्टी कशा कळतात हे गुपित आहे. त्यांचं ज्ञान अगाध आहे. काही विद्या वैगेरे प्राप्त असेल, माहिती असेल तर जरुर द्यावी. त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे" असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.