Adar Poonawalla (PC - PTI)

जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनी सीरम इन्सिट्युटच्या मांजरी येथील प्लांट (SII's Manjri plant) मध्ये आज आगीचा भडका उडाला आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी 1 च्या सुमारास लागलेल्या या आगीने बघता बघता 3 मजल्यांचे नुकसान केले आहे. या आगीवर आता सीरमचे सीईओ अदार पुनावाला (Adar Poonawalla) यांनी माहिती देताना दिलासादायक माहिती दिली आहे. दरम्यान ट्वीट करत त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये आग भडकल्याचं लक्षात आल्यानंतर सार्‍या व्यक्त केलेल्या काळजीचं आणि प्रार्थनेबददल धन्यवाद. आतापर्यंतची चांगली बाब म्हणजे या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. कोणतीही गंभीर दुखापत देखील झालेली नाही. केवळ काही मजले जळून खाक झाले आहेत. असे म्हटलं आहे.सोबतच त्यांनी कोविशिल्ड ही कोविड 19 वरील लसची निर्मिर्ती देखील सुरक्षित असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, सीरमच्या मांजरी येथील प्लांट मध्ये बीसीजीचे उत्पादन होत होते. तर ही नवी इमारत असून येथे काही जण काम करत होते. त्या 3-4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

अदार पुनावाला ट्वीट

ANI Tweet

दरम्यान पुण्याचे पोलिस कमिशनर अमिताभ गुप्ता देखील घटनास्थळी दाखल आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग नियंत्रणात येण्यास अजून तासाभराचा कालावधी लागू शकतो. सीरमच्या मांजरी प्लांट मध्ये सध्या कोणतीही निर्मीती सुरू नव्हती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम सुरू आहे. सध्या सारी इमारत रिकामी करण्यात आली आहे. मात्र तरीही पुन्हा तपासणी सुरू आहे. तसेच लसीच्या प्लांट आणि स्टोरेजला कोणताही धोका नाही.

सध्या सीरमच्या मांजरी प्लांटमधील आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या परिसरातील काही लोकांनी आग लागल्यानंतर काही स्फोटांचे आवाजा ऐकले आहेत.तातडीने आपत्कालीन उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दरम्यान सध्या तेथे एक एनडीआरएफची तुकडी तैनात आहे.