कोरोना व्हायरस (Coronavirus) लस निर्मिती करणाऱ्या पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग भडकली आहे. पुणे येथील मांजरी परिसरात सुमारे 100 किंवा त्याहून अधिक एकर जागेवर सीरमचा पसारा आहे. याच ठिकाणी आज (गुरुवार, 21 जानेवारी 2021) दुपारी एक वाजणेच्या सुमारास आग भडकली. आग (Serum Institute Building Fire in Pune) लागलेल्या इमारतीत सीरम इन्स्टिट्यूट कार्यालय आहे. अग्निशमन दलाला घटनेची माहिती तातडीने देण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे 10 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीरमच्या नवीन प्लांटमध्ये ही आग भडकली आहे. जुना प्लांट पूर्णपणे सुरक्षीत आहे. सीरम हे केवळ कोरोना लसीचे उत्पादन करत नाही तर त्याशिवायही इतर अनेक लसींची निर्मिती या संस्थेकडून केली जाते.
कोरोना लस निर्मिती केली जाते त्या ठिकाणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ही लस आणि ती निर्मिती करणारा प्लांट पूर्णपणे सुरक्षीत असल्याची प्राथमिक माहिती इन्स्टिट्यूट ने प्रसारमाध्यमांना दिली आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणी बीसीची लस निर्मिती केली जाते. ही लस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते. या विभागात काम करत असताना अचानक एका जागेहून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाजूला करण्यात आले.
#WATCH Maharashtra: 10 fire tenders present at Serum Institute of India in Pune, where a fire broke out at Terminal 1 gate. More details awaited. https://t.co/wria89t22t pic.twitter.com/u960KTR7JS
— ANI (@ANI) January 21, 2021
पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आग लागलेल्या परिसरात प्रचंड धूर आहे. जोपर्यंत धुर कमी होत नाही तोपर्यंत आग निश्चित किती प्रमाणावर आहे हे निटसे समजू शकत नाही. इमारत फारशी मोठी नाही अवघी चार ते पाच मजली इमारत आहे. परंतू, इमारतीत रासायनीक (केमिकल) साठा असण्याची शक्यता आहे. इमारतीत नेमकी कोणत्या प्रकारची रसायनं आहेत याबाबत माहिती मिळू शकली नाही. असे रणपिसे यांनी सांगितले.
Maharashtra: Fire breaks out at Terminal 1 gate of Serum Institute of India in Pune. More details awaited. pic.twitter.com/RnjnNj37ta
— ANI (@ANI) January 21, 2021
प्रशांत रणपिसे यांनी पुढे बोलताना सांगितले की, सुरुवातीला आग लागलेल्या इमारतीत 4 व्यक्ती अडकल्याचे समजले. त्यापैकी 3 व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. अद्याप एका व्यक्तीला बाहेर काढता आले नाही. त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे रणपिसे यांनी म्हटले आहे.