Uddhav Thackeray (Photo Credit: ANI)

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात (Citizenship Amendment Act) जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील (Jamia Millia Islamia University) विद्यार्थ्यांनी अंदोलन केली होती. त्यामळे पोलिसांनी संबधित अंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज केला होता. यावर संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या असून राजकारणही तापले आहे. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray Request) यांनीही यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. जालिया मिलिया इस्लामिया येथे जे घडले ते जालियांवाला बागसारखे आहे. तसेच प्रशासनाने विद्याथ्यांना अशी वागणूक देऊ नये, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारडे केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी नागपूर येथे माध्यमांशी संपर्क साधला असून जामिया मिलिया इस्लामिया येथील घटनेवर भाष्य केले आहे. जामिया मिलिया इस्मामिया येथे जे घडले ते जालियांवाला बागसारखे आहे. विद्यार्थी हे युवा बॉम्बसारखे असतात. प्रशासनाने विद्यार्थ्यांना अशी वागणूक देऊ नये, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे विनंती केली आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्याय विरोधात अनेक मुंबई येथील टाटा इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी कॅंडल मार्च काढत निषेध नोंदवला होता. हे देखील वाचा- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी Citizenship Amendment Act आणि NRC च्या विरोधात काढला निषेध मोर्चा

एएनआयचे ट्वीट-

नागरिकत्व दुरूस्ती कायदा या मुद्द्याने अधिक पेट घेतल्याचे दिसते आहे. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आसाम आणि मेघालयानंतर दिल्लीतूनही आवाज उठवला जात आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्णयावर अनेक राजकीय नेत्यांनी टीका केली आहे.