पश्चिम बंगालचे (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) हे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizenship Amendment Act) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल कॉंग्रेसने (TMC) नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात महानगरात मोर्चा काढला आहे. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तृणमूलचे कार्यकर्ते जमले आहेत. दुरूस्ती विधयेकाच्या विरोधात देशाभरातून विरोध दर्शवला जात आहे. महत्वाचे म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायदा मंजूर होण्यापूर्वी विरोध दर्शवला होता. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी न्याय व्यवस्थेच्या निगडीत बैठक घेतली होती.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शांततेने निषेध करावा, असे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले होते. तरीदेखील, रविवारी सलग तिसर्या दिवशी राज्याच्या विविध भागात वाहन पेटवून दिले होते. विविध जिल्ह्यात विविध ठिकाणी गाड्या थांबविण्यात आल्या, रेल्वे रुळांवर आणि रस्त्यांवर जाळपोळ करण्यात आली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या निवासस्थानी उच्चपदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली आणि हिंसक निदर्शने खपवून घेतली जाणार नाहीत. तसेच पोलिस प्रशासनाने त्यास कठोरपणे सामोरे जावे लागेल असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितले. हे देखील वाचा-जामीया मलिया, अलीगढमधील लाठीचार्जविरोधात मुंबई येथील टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेच्या विद्यार्थांनी कॅंडल मार्च काढत नोंदवला निषेध
एएनआयचे ट्वीट-
Kolkata: West Bengal Chief Minister Mamata Banerjee takes out a protest march against #CitizenshipAmendmentAct and #NRC pic.twitter.com/wWjHziRaLz
— ANI (@ANI) December 16, 2019
नागरिकत्व दुरूस्ती कायदा विरोधात देशाभरातून विरोध केला जात आहे. या कायद्याला आसाम, मेघालय आणि बंगाल मधून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. यानंतर जामीया मिलीया आणि अलीगढ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही याला विरोध दर्शवत निदर्शने करायला सुरुवात केली होती. परंतु, तेथील परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलिसांनी निदर्शन करणाऱ्या विद्यार्थांवर लाठीचार्ज केला होता. याचे प्रत्यु्त्तर म्हणून विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यामुळे दिल्लीत कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत.