भारतात नागरिकत्व दुरूस्ती विधेयक कायद्याला (Citizenship Amendment Act) देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. यातच नागरिक दुरूस्ती विधेयकाविरोधात जामीया मिलीया (Jamia Malia Institude) आणि अलिगढ विद्यापीठातील (Aligarh Institute) विद्यार्थांनी आंदोलन केली होती. हे आंदोनल नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यामुळे संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. दरम्यान, मुंबईतील टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (Tata Institute of Social Sciences) विद्यार्थांनी कॅंडल मार्च काढत या घटनेला निषेध नोंदवला आहे.
नागरिकत्व दुरूस्ती कायदा विरोधात देशाभरातून विरोध केला जात आहे. या कायद्याला आसाम, मेघालय आणि बंगाल मधून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. यानंतर जामीया मिलीया आणि अलीगढ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही याला विरोध दर्शवत निदर्शने करायला सुरुवात केली होती. परंतु, तेथील परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलिसांनी निदर्शन करणाऱ्या विद्यार्थांवर लाठीचार्ज केला होता. याचे प्रत्यु्त्तर म्हणून विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यामुळे दिल्लीत कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. यातच मुंबईतील देवनार टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या विद्यालर्थ्यांनी कॅंडल मार्च काढला आहे. हे देखील वाचा- नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीत आंदोलकांचा हिंसाचार; बसेस आणि दुचाकी जाळल्या
दिल्ली येथे घडलेल्या प्रकारचे संपूर्ण देशातून नामुष्की होत आहे. केवळ मुंबई मधीलच नव्हेतर, इतर विद्यापीठातील विद्यार्थीही या घटनेचा विरोध करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी दगडफेकीला प्रत्युत्तर म्हणून पोलीसदेखील दगडफेक करत होते.