VIDEO: प्रसिध्दी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊन फोटो आणि रिल्स बनवत असतात. सोशल मीडियाच्या जमान्यात तरुण पिढी स्वत: चा जीवाचा थोडासाही विचार करत नाही. सेल्फीचा मोह आवरेना, अवघ्या एका फोटोसाठी तरुणीने स्वत: चा जीव धोक्यात घातला आहे. ही घटना महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात घडली आहे. सेल्फी काढण्यासाठी आलेली एक मुलगी थेट पाय घसरून खड्ड्यात पडली. (हेही वाचा- मुंबईत जोरदार पाऊस; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद (Watch Video)
मिळलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात साताऱ्यात पर्यटकांची मांडियाळी पाहायला मिळते. सातारा येथील उंघर रोडवरील बोराणे घाटात एक तरुणी फिरायाला आली त्यावेळीस ती सेल्फी घेत असताना तीचा पाय घसरला आणि ती थेट १०० फुट दरीत पडली. पावसामुळे मैदान ओलसर झाले होते. त्यामुळे तीचा पाय घसरला असं काहींनी सांगितले. सुदैवाने, स्थानिक लोकांनी वेळीच धाव घेतली आणि तरुणीला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु केले. दोरीच्या साहाय्याने मुलीला वर काढण्यात आले. तरुणीला वाचण्यात आलेल्याच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र के सतारा में सेल्फी के चक्कर में खाई में गिरी लड़की
◆ स्थानीय लोगों ने किसी तरह घायल लड़की को बाहर निकाला#Maharshtra | #ViralVideos | Maharashtra pic.twitter.com/TQlVXbFNja
— News24 (@news24tvchannel) August 4, 2024
व्हिडिओत दिसल्याप्रमाणए, स्थानिक लोकांनी माहिती मिळताच, त्यांनी एका जाड दोरीच्या सहाय्याने मुलीला वाचवले. एका व्यक्तीने दोरी धरून खाली उतरून मुलीला उचलून दोरीच्या मदतीने तीला वर आणले. मुलगी वेदनेने ओरडत होती. स्थानिक लोकांनी त्यांचे प्राण वाचवले, तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. तरुणीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.