Mumbai Rain Update: मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अंधेरी, हिंदमाता परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहेत. अंधेरी सब-वे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भुयारी मार्गातून होणारी वाहतूक थांबवण्यात आली(Andheri Subway Close) आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाचे मोठे हाल होत आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीमध्येही पावसाची जोरदार हजेरी पहायला मिळाली. भारतीय हवामान विभाग (IMD) ने उद्या रविवारी महाराष्ट्र, गुजरात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. रस्त्यावर दीड फुटांपर्यंत पाणी साचलं आहे.(हेही वाचा:Waterlogging in Navi Mumbai: नवी मुंबई मध्ये मुसळधार पाऊस; सखल भागात साचलं पाणी)
व्हिडीओ पहा
Maharashtra: Due to continuous heavy rainfall in Mumbai, the Andheri Subway road has been closed. The heavy rains have caused waterlogging under the Andheri Subway pic.twitter.com/Z7K8Abj0Hz
— IANS (@ians_india) August 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)