अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती-घरांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (28 मे)  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत  निर्देश   दिले आहेत. मागील काही दिवसांमध्ये राज्यभर मान्सूनच्या पूर्व मोसमी सरी कोसळत आहेत. या तुफान पावसासोबत वीजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पीकांचे मोठ्या प्रमाण नुकसान झाल्याचं बघायला मिळालं आहे. पाण्यासोबत अन्नधान्य देखील वाहून गेलं आहे.  मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव यांनी सादरीकरण करताना सांगितले की, ‘सचेत’ प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत 19 कोटींहून अधिक सतर्कतेचे संदेश नागरिकांना पाठवण्यात आले आहेत. राज्य आपत्कालीन केंद्रामध्ये अत्याधुनिक संवाद यंत्रणा व निर्णय सहाय्य प्रणाली कार्यरत आहे. असे सांगण्यात आले आहे. Maharashtra Rain Update on 28 May: महाराष्ट्रात आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता; तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या आजचे हवामान. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)