Kumar Ailani (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ (Maharashtra Assembly Election 2019) तोंडावर आली आहे. यासाठी सर्व पक्षाने आपले उमेदवार घोषीत केले आहेत. याप्रमाणे भारतीय जनता पक्षाकडून (Bhartiya Janta party) उल्हासनगर (Ulhasnagar) मतदारसंघातून कुमार आयलानी (Kumar Ailani) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुमार आयलानी  शुक्रवारी उल्हासनगर येथून उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. आयलानी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर महाराष्ट्राचे (Maharashra) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पंतप्रधान (Prime Minister) म्हणत त्यांचे अभार मानले आहेत. यामुळे नेटकऱ्यांकडून त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धूमाकूळ घालत आहे.

भारतीय जनता पक्षाकडून कुमार आयलानी यांना उल्हासनगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, आयलानी हे उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात आले होते. आयलानी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस यांचे धन्यवाद केले. परंतु, व्हि़डिओच्या सुरुवातीला आयलानी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर लगेच आयलानी यांनी या चूकीवर माती टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना टोकावर धरले आहे. तसेच लोकांनी त्यांच्या सामन्य ज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. हे देखील वाचा- कोच रवि शास्त्री या फोटो मुळे झाले ट्रोल

ट्विट-

विधानसभा निवडणूक २०१९ येत्या २१ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष आपला झेंडा रवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.