महाराष्ट्रात अवघ्या दोन दिवसात विधानसभा निवडणूका पडणार आहेत. तर महाराष्ट्राच्या विदर्भातील वाशिम मतदारसंघ हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. तसेच कारंजा आणि रिसोड हे दोन्ही मतदारसंघ ही वाशिम मध्ये येतात. तर यंदाच्या विधासभा निवडणूकीसाठी शिवसेना-भाजप महायुतीसह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, मनसे आणि बहुजन आघाडी पक्ष कोणाला कशी टक्कर हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत.
>>कारंजा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 35
कारंजा येथे मराठा समाज 40 टक्के, मुस्लिम आणि दलित प्रत्येकी दहा टक्के आहे. त्याचसोबत बंजारा समजाचेही नागरिक या ठिकाणी राहतात. कारंजा येथे भारिपचे वर्चस्व आहे. यंदाचे येथे भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पटणी आहेत. 2014 मध्ये भारिपचे मो. युसुफ पुंजाणी यांना 40,604 मतांनी पराभव झाला होता. यावेळी ही पटणी यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके यांना तिकिट दिले आहे.
>>वाशिम विधानसभा मतदारसंघ क्रमांक 34
वाशिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने सलग 30 वर्ष आपली सत्ता प्रस्थापित केली. मात्र 2009 मध्ये भाजपचे लखन मालिक यांचा विजय होत त्यांची सत्ता आली. सध्या वाशिमधील भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक आहे. 2014 मध्ये शिवसेनेच्या शशिकांत पेंढारकर यांचा 43,803 मतांनी पराभव झाला आहे.
>>रिसोड विधानसभा मतदारसंघ क्रमांक 33
रिसोड मतदार संघात सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित झनक आहेत. तर झनक यांनी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून एक वर्ष काम केले होते. 2014 मध्ये झनक यांच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या भाजपच्या विजय जाधव यांचा 54,131 मतांनी पराभव झाला. यावेळच्या विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेकडून विश्वनाथ सानप यांना झनक यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.