एकतर्फी प्रेमातून तरुण तरुणीमधील वाद किंवा निघृण प्रकार तुम्ही ऐकले असाल. पण 50 वर्षीय पुरुषाने एकतर्फी प्रेमातून असं काही केलं आहे की या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला आहे. गांधी जिल्हा शांततेचा आणि अहिंसेचं प्रतिक असलेला वर्धा (Wardha Crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) एका पुरुषाने महिलेवर अॅसिड हल्ला (Acid Attack) केला आहे. अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव अर्जुन चाफले (Arjun Chafle) असुन सुडभावनेच्या हेतूने त्याने हा प्रकार केला असल्याची माहिती मिळत आहे. तरी अॅसिड हल्ला झालेली महिला शहरातील मध्यवर्ती महावीर बगिचा (Mahavir Garden) येथे तिकीट काउंटरवर कामाला होती. तरी ड्यूटीवर असतानाचा आरोपीने महिलेवर हा अॅसिड हल्ला केला असुन परिसरात मोठी खळबळ उडाली.
महावीर बगीचा (Mahavir Garden हा वर्धा (Wardha) शहराच्या मध्यभागी असुन शहरातील हे अत्यंत वर्दळीचं ठिकाण आहे. उद्यान असल्यामुळे या भागात लहान मुलं, तरुण तरुणी, वयस्क मंडळींची मोठी गर्दी असते तरी एवढ्या गर्दीच्या ठिकाणी असा प्रकार घडणं ही बाब अधिकचं धक्कादायक आहे. वर्धा पोलिसांकडून (Wardha Police) आरोपीस अटक करण्यात आली असुन संबंधीत गुन्हा या आरोपीवर दाखल करण्यात आला आहे. (हे ही वाचा:- Prohibitory Orders in Mumbai: मुंबईमध्ये 16 ते 30 ऑक्टोबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; कलम 144 लागू, फ्लाईंग कंदिल उडवण्यास बंदी)
तरी अॅसिड हल्ला (Acid Attack) झालेल्या महिलेवर सेवाग्राम येथील कास्तुरबा गांधी रुग्णालयात (Kasturba Gandhi Hospital) उपचार सुरु आहेत. आरोपी अर्जुन चाफले हा शहरातील महावीर बालोद्यानात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीवर होता. एकतर्फी प्रेमातून मद्यधूंद असलेल्या अर्जून चाफले याने उद्यानातच पीडितेच्या शरीरावर बाथरूममध्ये वापरल्या जाणारा ऍसिड सदृश दाहक पदार्थ फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती वर्धा पोलिसांकडून देण्यात आली आहे.