लॉकडाउनच्या (Lockdown) काळात विरार (Virar) मधील एका बंगल्यात शौचलयाच्या टाकीची स्वच्छता करत असताना गुदमरून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अन्य एका कर्मचाऱ्याची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार केले जात आहेत. ही घटना काल, 17 एप्रिल रोजी दुपारी साधारण 3 वाजताच्या सुमारास घडली. विरार पश्चिमच्या बोळींज मधील रानपाडा गावात राहणाऱ्य हेमंत घरत यांच्या बंगल्यातील शौचालयाची टाकी साफर करत असताना या कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वास्तविक हे कामगार प्रशिक्षित नव्हते, लॉक डाऊन काळात चार पैसे सुटतील अशा अपेक्षेने चार स्थानिक तरुणांनीच हे काम करायला तयारी दर्शवली होती. मात्र काम सुरु असतानाच विषारी वायूमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याने आता त्यांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. मुंबई: चोर समजून पालघर येथे 3 जणांची जमावाकडून हत्या
प्राप्त माहितीनुसार, नयन भोये, जयेंद्र मुकणे आणि तेजस भाटे अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. या तिघांनाही गुदमरू लागताच घरत यांनी त्यांना रुग्णालयात नेले होते, मात्र तिथे पोहचण्याचा आधीच तिघांचाही मृत्यू झाला होता. तर नितेश मुकणे या एकाचाच जीव वाचला असून विरार मधील संजीवनी खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, याप्रकरणात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच बंगल्याचे मालक यांनी कर्मचारी काम करताना दुर्ल्क्ष केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही अनेक ठिकाणी मुकादमाच्या तसेच मालकांच्या दुर्लक्ष केल्याने सफाई कर्मचाऱ्यांचा असाच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.